शिरपूरमधील नाल्यावरचे अतिक्रमण हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:42+5:302021-07-11T04:27:42+5:30

पर्यटन क्षेत्र शिरपूर येथे मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. त्यातच वाॅर्ड नं. ३ मधील ...

Encroachment on Nala in Shirpur will be stopped | शिरपूरमधील नाल्यावरचे अतिक्रमण हटणार

शिरपूरमधील नाल्यावरचे अतिक्रमण हटणार

Next

पर्यटन क्षेत्र शिरपूर येथे मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. त्यातच वाॅर्ड नं. ३ मधील देशी दारू दुकानासमोर पावसाचे व सांडपाणी वाहून नेणारा मोठा नाला आहे. या नाल्यावर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कच्चे, पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यातच १५ जून रोजी झालेल्या पावसाचे पाणी नाल्याकाठचा घरात व शेतात घुसले. त्यामुळे त्रस्त नागरिकांकडून किशोर देशमुख व काही स्थानिक नागरिकांनी नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली होती. ग्रामपंचायतने याची दखल घेऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी ८ जुलै रोजी नोटीस बजावली आहे.

--------------

तर ग्रामपंचायत काढेल अतिक्रमण

सांडपाण्याच्या नाल्यांवरील अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेता हे अतिक्रमण हटविण्याची नोटीस ग्रामपंचायतने संबंधितांना बजावली आहे. या नोटीसनुसार अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायत हे अतिक्रमण काढून त्यासाठी लागणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करेल, अशी सूचनाही नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.

Web Title: Encroachment on Nala in Shirpur will be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.