पाणंद रस्त्यावर अतिक्रमण; शेकडो शेतकऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:34 PM2020-08-25T17:34:08+5:302020-08-25T17:34:19+5:30
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अरुंद रस्त्यावर चिखल साचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील जुना मालेगाव ते एकांबा रोड तसेच वडप ते एकांबा रोड या पाणंद रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरूंद झाला. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना शेतात जाताना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी रमेश सोनटक्के, जय जोशी, रामकृष्ण सोभागे यांच्यासह शेतकºयांनी मालेगाव तहसिलदार रवींद्र काळे यांच्याकडे २४ आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद आहे की, शेकडो शेतकºयांचे शेत वडप, एकांबा शिवारात आहे. शेतात जाण्यासाठी जुना एकांबा ते वडप हा पांदण रस्ता आहे. मात्र या रस्त्यालगत काही शेतकºयांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. शेतात जाण्याकरता व्यवस्थित रस्ता नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अरुंद रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे शेतीची कामे करण्यास अडचण येत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी रमेश सोनटक्के, जय जोशी, रामकृष्ण सोभागे, गजानन चांदनशिव, सखाराम मोहळे, दीपक तिडके, नामदेव धामणे, विलास चनांदनशिव यांच्यासह शेतकºयांनी केली.