मालेगाव शहरात रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:18 PM2018-10-06T14:18:41+5:302018-10-06T14:19:04+5:30
मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगर पंचायतच्यावतीने शनिवार ६ आॅक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगर पंचायतच्यावतीने शनिवार ६ आॅक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली.
मालेगाव शहरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांन्ी २७ सप्टेंबर रोजी मालेगाव नगर पंचायतला दिले होते. त्या आदेशानुसार शनिवार ६ आॅक्टोबरपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहिम राबविण्यापूर्वी मालेगाव नगरपंचायतच्या कर्मचाºयांनी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून स्वत:हून अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले होते. रस्त्यालगतचे अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे अन्यथा नगर पंचायतच्यावतीने जेसीबीचा वापर करून हे अतिक्रमण हटविले जाईल. यासाठी अतिक्रमण काढण्याचा खर्च संबंधितअतिक्रमणधारकाकडून वसुल केला जाईल, अशी सुचनाही देण्यात आली होती. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे व नगरपंचायत ला सहकार्य करावे असे आवाहन मालेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले होते. या आवाहनाला काही लोेकांचा प्रतिसाद लाभला, तर काही अतिक्रमण जेसीबीच्या आधारे हटविण्यात आले. या अंतर्गत शहरातील जोगदंड हॉस्पिटल ते लहुजी उस्ताद पुतळ्यापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता लोलुरे, तलाठी अमोल पांडे, पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्यासह नगर पंचायत कर्मचाºयांच्या उपस्थितीत ही मोहिम राबविण्यात आली.