राज्य मार्गावरील शिरपूरनजीकचे अतिक्रमण हटविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:29 PM2018-06-04T14:29:33+5:302018-06-04T14:29:33+5:30
शिरपूर जैन - मालेगाव ते रिसोड या राज्य मार्गावरील शिरपूरनजीकचे टि जंक्शन येथील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात प्रशासनाच्यावतीने ४ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हटविले.
शिरपूर जैन - मालेगाव ते रिसोड या राज्य मार्गावरील शिरपूरनजीकचे टि जंक्शन येथील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात प्रशासनाच्यावतीने ४ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हटविले.
मालेगाव ते रिसोड मार्गावरील शिरपूर येथील टि जंक्शनजवळील हनुमान मंदिर हे अतिक्रमणात असून, सदर मंदिर हटविण्यात यावे, अशी तक्रार जिल्हास्तरीय लोकशाही दिनात करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, अशा सूचना मालेगाव तहसिलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाल्या दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस प्रशासन, तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्यातून सदर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही ४ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास केली. मंदिरातील हनुमान मूर्तीची विधिवत पूजा करून व्यवस्थितपणे मूर्ती काढण्यात आली व सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली. त्यानंतर अतिक्रमण हटविण्यात आले. हनुमानाची मूर्ति हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.सी. खारोळे, शाखा अभियंता के.एस. जोगदंड, नायब तहसिलदार हातेकर, मंडळ अधिकारी घनश्याम दलाल, ग्रामविकास अधिकारी व्ही.ए. नवघरे, पोलीस निरीक्षक हरिष गवळी, पोलीस उपनिरीक्षक गणेश मूपडे, पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव, रतन बावस्कर, रामेश्वर जोगदंड, पंजाब घुगे, बबन खिराडे, प्रशांत राजगुरू आदींची उपस्थिती होती. मंदिर हटविल्याने हनुमान भक्तांमधून नाराजीचा सूर उमटला होता.