वाशिम शहरात अतिक्रमण होतेय पूर्ववत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:10 PM2020-01-03T15:10:43+5:302020-01-03T15:10:54+5:30

फूटपाथवर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे.

Encroachment in Washim city | वाशिम शहरात अतिक्रमण होतेय पूर्ववत!

वाशिम शहरात अतिक्रमण होतेय पूर्ववत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील अतिक्रमण मोठया प्रमाणात काढण्यात आले. यापूर्वी कधी न काढण्यात आलेले अतिक्रमण प्रथमच काढण्यात आले. परंतु गत दोन ते तीन दिवसांपासून शहरातील काही भागात अतिक्रमण पूर्ववत होताना दिसून येत आहे. याकडे नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.
वाशिम शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अतिक्रमण व शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक होती. वाशिम शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक राजू वाटाणे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी दोन्हीही समस्या निकाली काढल्यात याबाबत नागरिकांतून कौतूक होत आहे. परंतु गत दोन दिवसांपासून शहरातील
फूटपाथवर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे. तसेच पाटणी चौक ते शिवाजी चौक पूर्णपणे फेरीवाल्यांपासून मुक्त झाला असला तरी रिसोड नाक्यावर या लघुव्यावसायिकांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे आता त्या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमेव्दारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले परंतु अद्याप अनेक ठिकाणचे अतिक्रमण अद्याप बाकी दिसून येत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देऊन शहर अतिक्रमण मुक्त करणे गरजेचे झाले आहे.  

या भागात होत आहे अतिक्रमण

वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावरील हटविण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते मोकळे झाले होते परंतु ज्या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले होते तेथे लघुव्यावसायिकांनी तात्पुरते आपले उद्योग सुरु करुन अतिक्रमण सुरु केले आहे. यामध्ये प्रामुख्याने रिसोड नाका, पाटणी चोैक ते आंबेडकर चौक, पुसद नाकासह इतरही ठिकाणचा समावेश आहे. आंबेडकर चौकातील फूटपाथ पूर्णपणे रिकामी झाली होती. परंतु आता हळूहळू येथे अतिक्रमण पूर्ववत होताना दिसून येत आहे. सुरुवातीला अतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसापर्यंत त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली. तोपर्यंत अतिक्रमण झाले नव्हते परंतु सद्यस्थितीत अतिक्रण होताना दिसून येत आहे.


शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम पारदर्शीपणे राबविण्यात आली आहे. जेथे जेथे अतिक्रमण दिसून आले तेथील अतिक्रमण काढण्यात आले आहे. काही ठिकाणी अतिक्रमण राहिले असल्यास तेही नक्कीच काढण्यात येणार आहे. नागरिकांनी, लघुव्यावसायिकांनी सुध्दा अतिक्रमण मोहीमेला सहकार्य करावे व अतिक्रमण करुन शहराला बेताल बनवू नये. आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे.
- दीपक मोरे
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

 

Web Title: Encroachment in Washim city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम