कामरगावातील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 09:36 PM2017-10-29T21:36:19+5:302017-10-29T22:05:41+5:30

कामरगाव :  सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा यांच्यावतीने कामरगाव नागझरी रस्ता व लाडेगाव चौकापर्यंत अतिक्रमण मोहीम १३ आॅक्टोंबर रोजी राबविण्यात आली होती. याला पंधरा दिवसाचा अवधी उलटत नाही तर पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात  झाली आहे.

The encroachments were removed from the Kamarga! | कामरगावातील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे!

कामरगावातील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे!

Next
ठळक मुद्देरस्त्याच्या कडेला थाटली दुकाने प्रवासी निवारा बांधा

लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव :  सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा यांच्यावतीने कामरगाव नागझरी रस्ता व लाडेगाव चौकापर्यंत अतिक्रमण मोहीम १३ आॅक्टोंबर रोजी राबविण्यात आली होती. याला पंधरा दिवसाचा अवधी उलटत नाही तर पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात  झाली आहे.
कामरगावातील एका धनाढ्याच्या कॉम्पलेक्सला एका पानटपरीमुळे त्रास होत असल्यामुळे आपल्या पैशाच्या व ओळखीच्या जोरावर एका पानटपरीसाठी संपूर्ण कामरगावातील लघु व्यवसायावर दिवाळीच्या तोंडावर सा.बां.विभागाने गजराज फिरविला असल्याची गावात चर्चा होत आहे.  पंरतु काढलेले अतिक्रमण सर्वच अतिक्रमणधारकांनी मोहीम संपल्यानंतर पुर्ववत आपल्या जुन्याच ठिकाणी आपले व्यवसाय थाटण्यासस सुरुवात केली.  लघुव्यावसायिकांनी पुर्वीपेक्षा रस्त्याच्या कडेला आपली दुकाने लावल्याने सुरुवात केल्याने रहदारीस अडथळे निर्माण होत आहेत. अतिक्रमणात असलेला प्रवासाी निवारा मोहीमे दरम्यान न तोडल्याने संतप्त अतिक्रमणधारकांनी तो रात्रीच्यावेळी तोडून टाकला होता याचा फटका मात्र आता प्रवाशांना उन्हात उभे राहून बसत आहे. 
सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण मोहीमेदरम्यान प्रवाशी निवारा तोडावा अशी मागणी काही प्लॉटधारकांनी केली होती, परंतु अधिकारी नवलकर यांनी प्रवाशी निवारा  तोडण्यात मनाई होती.याबाबत मात्र अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही.

Web Title: The encroachments were removed from the Kamarga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.