ऊर्जामंत्री १७ पासून वाशिम जिल्ह्यात!
By admin | Published: May 10, 2017 07:22 PM2017-05-10T19:22:54+5:302017-05-10T19:22:54+5:30
ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ व १८ मे २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौºयावर येत आहेत.
वाशिम : ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ व १८ मे २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. १७ मे रोजी मालेगाव तालुक्यातील खंडाळा येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित शिरपूर-खंडाळा ३३/११ के. व्ही. विद्यूत उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. १८ मे रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत त्यांच्याहस्ते दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनांतर्गत बेलमंडल (ता. कारंजा), कुपटा (ता. मानोरा), आसेगाव (ता. रिसोड) येथे मंजूर ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन होईल. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय प्रांगणात जनतेच्या तक्रारी स्विकारणार आहेत. यामध्ये महावितरण, महापारेषणसह राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. याशिवाय दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात लोकप्रतिनिधींसमवेत ते बैठक घेणार आहेत, असा दौरा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आला आहे.