खरीप हंगामपूर्व आढावा सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:17+5:302021-05-09T04:42:17+5:30

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.एम. तोटावार उपस्थित होते. सर्वप्रथम ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व तालुक्यातील विविध ...

Enthusiasm for kharif pre-season review meetings | खरीप हंगामपूर्व आढावा सभा उत्साहात

खरीप हंगामपूर्व आढावा सभा उत्साहात

Next

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.एम. तोटावार उपस्थित होते.

सर्वप्रथम ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व तालुक्यातील विविध योजनांचे सादरीकरण तालुका कृषि अधिकारी के.डी. सोनटक्के यांनी केले. यावेळी राजेंद्र पाटणी यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर घरगुती सोयाबीन राखून ठेवण्याबरोबर बियाणांची उगवणशक्ती तपासून तसेच जैव-रासायनिक बीजप्रक्रिया करुनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन केले. मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पीक ठिबक सिंचनद्वारे घ्यावे, संत्रावर्गीय फळपिकांबरोबर कमी पाण्याची आवश्यकता असणारे सीताफळ सारखे फळपीकही प्राधान्याने घ्यावे. यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अधिक वृद्धी होईल, असे प्रतिपादन केले. तालुक्यात फळपिकांचे क्षेत्र दुपटीने वाढवावे त्याचबरोबर कार्यरत पोकरा, महाडीबीटी, मग्रारोहयो आदी योजना अधिक गतिमान पद्धतीने शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्यात तसेच हंगामात बियाणे, रासायनिक खते व कीडनाशके यांचा कोणताही तुटवडा भासणार नाही, या संदर्भात नियोजन करण्याविषयी कृषि विभागास सूचित केले.

प्रमुख मार्गदर्शक एस.एम. तोटावार यांनी नियोजित ग्रामस्तरीय घरगुती सोयाबीन उगवणक्षमता चाचणी व बीजप्रक्रिया कार्यक्रमास महिला बचत गट, ग्राम कृषि विकास समिती सदस्य यांचा सहभाग घेणे संदर्भात मार्गदर्शन केले. पेरणीकरिता योग्य बियाणे प्रमाण राखण्यासाठी ट्रॅक्टर चालक-मालक यांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना त्यांनी तालुकास्तरीय कृषि अधिकारी,कर्मचारी यांना दिल्या. या ऑनलाईन खरिपपूर्व आढावा सभेस तालुक्यातील जि.प. सदस्य, पं.स. सभापती, पं.स. सदस्य, ग्रा.पं. सदस्य त्याचबरोबर उपविभागीय कृषि अधिकारी डी.के. चौधरी, कृषि उपसंचालक निलेश ठोंबरे, कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, तहसीलदार शारदा जाधव, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, मंडळ कृषि अधिकारी जी.व्ही. जैताडे, व्ही.के. घोडेकर, पं.स. कृषि अधिकारी डी.एस. मकासरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप थोरात (वाशिम) यांनी केले व आभार प्रदर्शन के.डी. सोनटक्के यांनी केले.

Web Title: Enthusiasm for kharif pre-season review meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.