महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:38 AM2021-02-14T04:38:40+5:302021-02-14T04:38:40+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रवीण हाडे, तर प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ॲड. सागर इरतकर, इरफान सय्यद, ...
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रवीण हाडे, तर प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ॲड. सागर इरतकर, इरफान सय्यद, प्रा. पुरुषोत्तम चाटे, प्रा. गोपाल कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाकडून माजी विद्यार्थ्यांना फोन, ई-मेल, व व्हाट्सॲप द्वारे निमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ.अमोल अढाव यांनी माजी विद्यार्थी संघटना म्हणजे काय, त्यांचे कार्य व महाविद्यालयामध्ये त्याचे महत्त्व व त्यांचे नॅकच्या पुनर्मूल्यांकनासाठी व सामाजिक प्रगतीसाठी या संघटनेचे महत्त्व विशद केले. तसेच माजी विद्यार्थी संघटना वेगवेगळ्या क्षेत्रात कशी मदत करू शकते, याची सुद्धा सर्व माजी विद्यार्थ्यांना कल्पना दिली. प्रा.डॉ.प्रवीण हाडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा कसा खारीचा वाटा असतो याची संकल्पना समजावून सांगितली. प्रा. पुरुषोत्तम चाटे यांनी महाविद्यालयासाठी आजीवन एक ग्रंथ भेटवस्तू स्वरूपात देणार असल्याचे सांगितले. इरफान सय्यद यांनी महाविद्यालयासाठी आम्ही सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक व शैक्षणिक अशा विविध वेगवेगळ्या स्वरूपात सदैव मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केशव कोकाटे व आभारप्रदर्शन डॉ.पी .एस फाटक यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.जे.जे खडसे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.