वाशिमच्या शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरनपुरक होळीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:21 PM2018-02-28T15:21:54+5:302018-02-28T15:21:54+5:30

वाशिम  : एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक  अभिजीत मुकूंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी  केले.

Environmental Holi message given by school students from Washim | वाशिमच्या शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरनपुरक होळीचा संदेश

वाशिमच्या शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरनपुरक होळीचा संदेश

Next
ठळक मुद्दे एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन. पाण्याची बचत करावी असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे.

वाशिम  : एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक  अभिजीत मुकूंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी  केले. दरवर्षी  आपल्या राज्यात होळीचा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. यामुळे  मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते व विशेषता वनामध्ये  आगी लावुन वन्य प्राण्याची शिकार सुध्दा केली जाते, तसेच होळी जळतांना  त्यासाठी मोठ्या प्रमाणावर हवेतील आॅक्सीजन वापरला जावुन कार्बन वायमुळे  हवेचे प्रदुषण होते. या शिवाय धुळवाडीचा वेळेस  वापरण्यात येणारे रासायनिक रंग माणसासाठी तसेच पर्यावरणासाठी अतिशय घातक असतात, अप प्रवृत्तीचा नाश व्हावा या उद्देशाने होळी हा सण साजरा करण्यात येतो, परंतु हा उद्देश  मागे पडत चाललेला असुन ही होळी पर्यावरणात्मक साजरी करण्यासाठी खेलो होली इको फे्रंडली या संकल्पनेचा पुरस्कार करणे आवश्यक आहे . त्यासाठी  होळीची संख्या कमी करणे व होळीचा   आकार लहान करणे, होळीसाठी  लाकडाचा व गोवºयाचा कमीत कमी वापर करणे, शक्यतोत्तर  प्रतिकात्मक होळी साजरी करणे , होळीमध्ये जाळण्यासाठी  एरंडीचा झाडांची  आवश्यकता असते त्याची ही तोड होते, यासाठी एरंडीच्या बिया गोळा करुन योग्य ओलाव्याच्या जागी लावणे तसेच धुळवाडीच्या वेळी वापरण्यात येणाºया कृत्रीम रंगाचे दुष्परिणाम  जाणवतात. त्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे आवाहन केल्या जात आहे.

 

कृत्रिम रंगाचे दुष्परिणाम

काळा रंग - आॅक्साईड मुत्र संस्थेचे कार्य बंद होणे, हिरवा - कॉपर सल्फेट, डोळ्यांना अ‍ॅलर्जी होणे, सुजण. चांदीसारखा रंग -अ‍ॅल्युमिनीयम ब्रोसाईड कॅन्सर  निळा  - पार्शोयन निळा त्वचेचा आजार. लाल  रंग  - मर्क्युअरी सल्फाईड अतिशय विषारी यामुळे  त्वचेचा कॅन्सर होवु शकतो.  वरील दुष्परिणाम  लक्षात घेता आपण नैसर्गीक  रंग घरीच तयार करुन त्याचा वापर करु शकतो.

नैसर्गिक रंग व तयार करण्याची पध्दत

जांभळा रंग - बिट साल किंवा गरापासुन पाण्यात टाकुन ढवळणे.  पिवळा रंग - बेल फळाची साल पाण्यात उकळणे, एक भाग हळद, दोन भाग कोणतेही पिठ तसेच झेंडुच्या फुुलांपासुन पिवळा रंग तयार होतो.   काळारंग - आवळा किस लोखंडी ताव्यावर टाकुन पाणी टाकुन उकळणे.  नारंगी रंग - बेल फळाचा गर पाण्यात टाकुन उकळणे.  लाल रंग - जास्वंद, पळस किंवा गुलाब फुलांचा कुटून लगदा करुन पाण्यात ढवळणे.  हिरवारंग -  गहु, ज्वारी, पालक, किंवा कोणत्याही हिरव्या पानांचा कुटून लगदा करन पाण्यात ढवळणे.  कोरडा रंग : साधारणा कोरडा रंग तयार करण्यासाठी फुलांच्या पाकळ्या सावलीत वाळवाव्यात. त्या कुरकुरीत वाळल्यानंतर त्यात तुरटी मिसळुन  अतिशय बारीक वाटावे . सावलीत वाळविल्याने रंग उडत नाही व तुरटीसह बारीक वाटल्याने तो पावडरीसारखा चांगला चिटकतो.  असे विविध रंग  आपआपल्या घरी तयार करुन   इकोफें्रडली  होळी साजरी करावी . तसेच पाण्याचा  दुष्काळ पाहता पाण्याची बचत करावी असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे. सदर उपक्रमाचे अनुकरण करुन पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Environmental Holi message given by school students from Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.