सावली प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धन मोहिम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 07:07 PM2017-09-11T19:07:01+5:302017-09-11T19:07:49+5:30

वाशिम - स्थानिक सावली प्रतिष्ठान आणि जे.सी.आय. वाशिम सीटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन मोहिम हाती घेण्यात आली असून, कोंडाळा झामरे येथे  रविवारी कार्यक्रम घेण्यात आला.

Environmental promotion campaign by Shadow Foundation! | सावली प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धन मोहिम !

सावली प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धन मोहिम !

Next
ठळक मुद्देसावली प्रतिष्ठान व जे.सी.आय. वाशिम सीटी चा संयुक्त उपक्रमवृक्षारोपण करून घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - स्थानिक सावली प्रतिष्ठान आणि जे.सी.आय. वाशिम सीटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन मोहिम हाती घेण्यात आली असून, कोंडाळा झामरे येथे  रविवारी कार्यक्रम घेण्यात आला.
कोंडाळा झामरे येथे रवी बुंधे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असुन त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन सावली प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. सोबतच कोंडेश्वर मंदिर परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या व केरकचरा गोळा करून विल्हेवाट लावण्यात आली. याप्रसंगी सावली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुनिल नंदकिशोर हेंद्रे, रुपेश काबरा, अजय यादव, रोहिदास धनगर, वैभव निंबेकर, दिपक हेंबाडे, गोपाल हेंबाडे, संदिप राउत, सल्लागार डिगांबर घोडके, बंडु गव्हाणे, स्वप्निल मते, निखिल पखाले, प्रविन होनमणे, अम्रुता महात्मे, संगिता गव्हाणे रश्मी मोहटे, वृषाली बाभणे तसेच ‘खउक’चे पंकज बाजड, राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातकिशोर वाघ, गणेश इंगोले  यांच्यासह गावकरी मंडळीचे सहकार्य लाभले. वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला जाणार आहे, असा मानस सावली प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला.

Web Title: Environmental promotion campaign by Shadow Foundation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.