समान निधी वाटपाचा ठराव मंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:04+5:302021-09-02T05:29:04+5:30
वाशिम : गत काही वर्षांपासून बहुतांश सभेत गाजत असलेला समान निधी वाटपाचा मुद्दा अखेर ३१ ऑगस्टच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ...
वाशिम : गत काही वर्षांपासून बहुतांश सभेत गाजत असलेला समान निधी वाटपाचा मुद्दा अखेर ३१ ऑगस्टच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निकाली निघाला आहे. सर्व सदस्यांना समान निधी वाटप करण्यात यावा, असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेचे पीठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.श्याम गाभणे होते. यावेळी सभापती चक्रधर गोटे, वनिता देवरे व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांची उपस्थिती होती. जिल्हा वार्षिक योजनेतील पाझर तलावास मान्यता, प्राप्त निधीतून करावयाची कामे, प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता, १५व्या वित्त आयोगांतर्गतच्या निधीचे नियोजन, जनसुविधा, तीर्थक्षेत्राचे नियोजन यासह विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी सर्व सदस्यांना समान निधी वाटप करावा, असा आग्रही मुद्दा उपस्थित केला. यावर सविस्तर चर्चा होऊन शेवटी समान निधी वाटपाचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेला जि.प. सदस्य डॉ.सुधीर कव्हर, दिलीप देशमुख, श्याम बढे, पांडुरंग ठाकरे, रिसोड पंचायत समितीचे सभापती सुभाष खरात यांच्यासह सदस्यांची व विभाग प्रमुखांची बहुसंख्येने उपस्थिती होती.