विर्सजित केलेल्या प्लास्टरच्या मूर्ती जलाशयातच आहेत पडून, पर्यावरणाचा होतोय -हास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 03:01 PM2017-10-03T15:01:49+5:302017-10-03T15:02:32+5:30

अलिकडेच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवदुर्गोत्सवात अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचाच वापर केला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर अद्यापही त्या मूर्ती पाण्यात तशाच पडून असल्याने त्याचा जलचरांसह मानवी जीवनावर मोठा विपरित परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

The erosion of stucco images are in the reservoir, the environmental degradation | विर्सजित केलेल्या प्लास्टरच्या मूर्ती जलाशयातच आहेत पडून, पर्यावरणाचा होतोय -हास

विर्सजित केलेल्या प्लास्टरच्या मूर्ती जलाशयातच आहेत पडून, पर्यावरणाचा होतोय -हास

Next

वाशिम (इंझोरी) : अलिकडेच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवदुर्गोत्सवात अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचाच वापर केला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर अद्यापही त्या मूर्ती पाण्यात तशाच पडून असल्याने त्याचा जलचरांसह मानवी जीवनावर मोठा विपरित परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

मानवाची हट्टखोरवृत्ती आणि अज्ञानामुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस -हास होतच असून, या संदर्भात मोठ्या शहरांपासून ते ग्रामस्तरापर्यंत विविध पद्धतीने करण्यात येत असलेल्या जनजागृतीचा काहीच फायदा होत नसल्याचे अलिकडेच पार पडलेल्या गणेश विसर्जन आणि दुर्गादेवी विसर्जन सोहळ्यातून स्पष्ट होत आहे. मोठ्या भक्तीभावाने हे उत्सव साजरे करणा-या मंडळांनी प्लास्टरच्या मूर्ती स्थापित करून त्यांचे विसर्जन मानोरा तालुक्यातून वाहणा-या अडाण नदीपात्रात केले.  

मुळात प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे यापासून तयार केलेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर हे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मूर्तीर्चे घातक रासायनिक रंग पाण्यातील मासे, अन्य जलचर यांच्या शरीरात जातात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. पाण्यातील वनस्पतींसाठीही प्लास्टर ऑफ पॅरिस आणि हे रासायनिक रंग धोकादायक आहेत. त्यामुळे विहिरी, तलाव, नदी, समुद्र यातील जलचरांसाठी ते घातक ठरते. प्लास्टरच्या मूर्तीमध्ये वापरल्या जाणा-या क्रोमियम, लेड, मक्युर्री, कॅडियम आदी घातक घटक या रासायनिक रंगांमध्ये असतात.

तसेच सल्फर, फॉस्फरस, मॅग्नेशियम या घातक गोष्टींचाही वापर यात केलेला असतो. हे सर्व घटक पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे ते पर्यावरण व निसगार्साठी घातक आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचे विसर्जन नदी, तलाव, विहिरी यात केल्यामुळे निसगार्ची पयार्याने पर्यावरणाची हानी होतेच, पण त्याचबरोबर पाण्यातील जलचरांसाठीही ते धोकादायक ठरते. तथापि, याकडे सुशिक्षित मंडळीही हेतूपरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. 
 

Web Title: The erosion of stucco images are in the reservoir, the environmental degradation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.