२८ हजार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:59 PM2020-01-06T13:59:34+5:302020-01-06T13:59:40+5:30
दोन दिवसात अर्थात ७ जानेवारीपर्यंत त्रूटी दूर न झाल्यास संबंधित शेतकºयांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत आधार क्रमांकात त्रूटी असलेल्या ९५ हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास ६७ हजार शेतकºयांनी ५ जानेवारीपर्यंत ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून दुरूस्ती केली असून, अद्याप २८ हजार शेतकºयांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम आहेत. दोन दिवसात अर्थात ७ जानेवारीपर्यंत त्रूटी दूर न झाल्यास संबंधित शेतकºयांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १०० शेतकरी कुटूंबाचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला आहे. यापैकी ९७ हजार ७२७ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आढळून आलेल्या आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांच्याकडे आधार कार्ड व बँॅकेच्या पासबुकची छायांकित प्रत देणे अपेक्षित आहे. आधार कार्ड संबधित त्रुटीच्या दुरुस्ती नजिकच्या सीएससी केंद्रातून केल्या जाऊ शकतात. याशिवाय स्वत: लाभार्थ्याना कोणत्याही अॅन्ड्राइड मोबाईल संचावरुनही आधार संबंधित दुरुस्ती करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान डॉट गव्ह. डॉट ईन’ या संकेतस्थळावर जावून होम स्क्रीनवरील हिरव्या पट्टीमधील डावीकडून क्रंमाक आठवर ‘फार्मर्स कॉर्नर’ची सुविधा देण्यात आली आहे. या आॅप्शनचा वापर करून शेतकºयांना आपल्या आधारकार्डमधील दुरुस्ती करता येते. दुरूस्ती करण्याला पाचव्यांदा मुदतवाढ दिली असून, ७ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही २८ हजार ७०० शेतकºयांनी अजून आधार क्रमांकात आवश्यक ती दुरूस्ती केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात ५ जानेवारीपर्यंत ९५ हजार शेतकºयांपैकी ६७ हजार शेतकºयांनी दुरूस्ती केली असून, अद्याप २८ हजार ७०० शेतकºयांनी दुरूस्ती केली नाही. आधार क्रमांकातील त्रूटीची पुर्तता करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे. त्रूटीची पुर्तता न केल्यास अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.