बार्टी संस्थेकडून काढण्यात आलेल्या जाहिरातीत त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:51+5:302021-07-07T04:51:51+5:30
संशोधक विद्यार्थी गणेश धांडे यांच्या नेतृत्वाखालील एम.फिल विद्यार्थी शिष्टमंडळाने १७ जून रोजी पत्रकार बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची भेट ...
संशोधक विद्यार्थी गणेश धांडे यांच्या नेतृत्वाखालील एम.फिल विद्यार्थी शिष्टमंडळाने १७ जून रोजी पत्रकार बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची भेट घेऊन एम.फिल संशोधक विद्यार्थ्यांसाठी तात्काळ फेलोशिपची जाहिरात काढण्यात यावी व सन २०१८ प्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१९-२०, २०२०-२१ या दोन शैक्षणिक वर्षातील एम.फिल संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी. अशी मागणी केली होती. त्यानंतर बार्टी संस्थेच्या ३० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत एम.फिल संशोधक विद्यार्थ्याना फेलोशिप देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला, परंतु बार्टी संस्थेने काढलेल्या फेलोशिप जाहिरातीत शैक्षणिक वर्ष २०१९ आणि २०२० या दोन्ही शैक्षणिक वर्षातील एम.फिल आणि पीएचएडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी फक्तं ४०० जागा काढण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थी संख्येचा विचार करतां या जागा अपुऱ्या आहेत.
त्यामुळे या जाहिरातीत सुधारणा करून नवीन जाहिरात प्रकाशित करण्यासह फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्याना सारथी संस्थेप्रमाणे सरसकट फेलोशिप द्यावी किवा दोन्ही वर्षासाठी ११०० फेलोशिपच्या जागा काढण्यात याव्यात. तसेच बार्टी संस्थेने ४० टक्के आणि ६० एम.फिल, पि.एचडी नियमाची अट रद्द सामान फेलोशिपच्या जागा काढण्यात याव्यात, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी निवेदनातून केली आहे
----------
दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा
एमफिलच्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप करीता नवीन जाहिरात प्रसिद्धी न केल्यास एम.फिल संशोधक विद्यार्थी कोरोना नियमाचे पालन करून बार्टी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा विद्यार्थी गणेश धांडे व सर्व एम.फिल संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या बार्टी संस्थेला दिला आहे. निवेदनावर गणेश धांडे, सोनाजी गवई, अमोल मोरे, सोनाली अवसरमोल, निशा नरवाडे, शून्यता सावंत, मनिषा बल्लाळ, रेखा साळवे इत्यादी १०० संशोधक विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.