संकेतस्थळ बंद; आॅनलाईन अर्ज प्रक्रिया तांत्रिक अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 03:48 PM2019-04-30T15:48:40+5:302019-04-30T15:48:49+5:30

वाशिम : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. मात्र, २० एप्रिलपासून संकेतस्थळ बंद असल्याने उमेदवारांना तांत्रिक बिघाडाचा फटका बसत आहे.

Error on Website; Online application process technical difficulties! | संकेतस्थळ बंद; आॅनलाईन अर्ज प्रक्रिया तांत्रिक अडचणीत !

संकेतस्थळ बंद; आॅनलाईन अर्ज प्रक्रिया तांत्रिक अडचणीत !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. मात्र, २० एप्रिलपासून संकेतस्थळ बंद असल्याने उमेदवारांना तांत्रिक बिघाडाचा फटका बसत आहे. दरम्यान ३० एप्रिल ही अंतिम मुदत असतानाही, दुपारी ३.३० वाजेपर्यंतही संकेतस्थळ सुरू झाले नाही. 
गत काही महिन्यांपासून शिक्षक पदभरती बंद होती. आता सदर पदभरतीसाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. एकूण २५ जिल्हा परिषदांमध्ये ५१५२ पदे, ११ महानगरपालिकांमध्ये ५६३ जागा, ५२ नगर परिषदांमध्ये २६१ जागा, १२५ खासगी प्राथमिक शाळांमध्ये २६१ जागा आणि ६१२ खासगी माध्यमिक शाळांमध्ये ३७६४ जागा अशा एकूण १० हजार १ जागांसाठी डीटीएड, बी.एड. तसेच टीईटी व अन्य पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सुरूवातीला ३१ मार्च २०१९ अशी अंतिम मुदत होती. मात्र, अंतिम मुदतीपर्यंत अनेक उमेदवारांना अर्ज सादर करता आले नसल्याने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. संकेतस्थळ बंद राहत असल्याने अनेक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. जवळपास २० एप्रिलपासून संकेतस्थळ बंदच असल्याने जिल्ह्यातील अनेक उमेदवार आॅनलाईन अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की संकेतस्थळ बंद असल्याची माहिती वरिष्ठस्तरावर देण्यात आली.

Web Title: Error on Website; Online application process technical difficulties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.