किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:49 PM2019-07-15T15:49:26+5:302019-07-15T15:49:41+5:30
मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यात सध्या शेतकºयांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत बँक खात्यात पैसे जमा करणे सुरू आहे. धानोरा येथे आधार कार्ड, मोबाईल नंबर एका शेतकºयाचा तर बँक खाते क्रमांक दुसºया शेतकºयाचे असे प्रकार उघडकीस आले आहेत. जवळपास १०० शेतकºयांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांच्या बँक खात्यात दोन ते तीन वेळा पैसे जमा झाले तर काही शेतकºयांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. धानोरा येथे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक एका शेतकºयाचा तर बँक खाते दुसºया शेतकºयाचे असल्याचे प्रकार घडत आहेत. धानोरा येथील शेतकरी अमोल मधूकर हागे या शेतकºयाचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक असून, बँक खाते क्रमांक मात्र अन्य दुसºयाच शेतकºयाचे आहे. त्यामुळे अमाले हागे यांचे पैसे दुसºया शेतकºयाच्या बँक खात्यात जमा झाले. जवळपास १०० शेतकºयांसोबत हा प्रकार घडला आहे.
तलाढी अहवालानुसारच शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. तरीसुध्दा आॅनलाईन याद्या तपासूनच पुढील कारवाई करण्यात येईल.
- दामोधर पाचरणे
नायब तहसिलदार मानोरा
आधार कार्ड व मोबाईल नंबर माझा आहे. परंतू बँक खाते दुसºया शेतकºयाचे असल्यामुळे आलेला पैसा दुसºयाच्या बँक खात्यात जमा झाला. हा प्रकार जवळपास १०० शेतकºयांसोबत घडला आहे.
- अमोल पाटील, शेतकरी धानोरा