कोरोनाचा उद्रेक; जिल्ह्यात प्रथमच ३१८ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:49+5:302021-02-25T04:56:49+5:30
गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला असून, कोरोनाबाधितांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. एकाच दिवशी ...
गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला असून, कोरोनाबाधितांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ३१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील १९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंदही बुधवारी घेण्यात आली. ३१८ पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील २, छत्रपती शिवाजी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ३, देवपेठ येथील ३, आययुडीपी येथील ४, काटीवेस येथील १, लाखाळा येथील १, माधवनगर येथील १, नंदीपेठ येथील १, नवीन आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील २, टिळक चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अडोळी येथील १, अनसिंग येथील २, गुंज येथील १, जुमडा येथील १, केकतउमरा येथील १, कोंडाळा येथील ४, मालेगाव शहरातील २, जऊळका येथील १, बोरगाव येथील १, गिव्हा कुटे येथील १, शेलू फाटा येथील १, मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील १, पाळोदी येथील १, पोहरादेवी येथील १, साखरडोह येथील १, वाईगौळ येथील १, कारंजा शहरातील अकोला अर्बन बँक परिसरातील ३, भगतसिंग चौक परिसरातील १, भारतीपुरा येथील ३, दत्त कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, जागृतीनगर येथील १, बाबारे कॉलनी येथील १, गणपती नगर येथील २, जिरापुरे कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, माळी कॉलनी येथील १, निवारा कॉलनी येथील २, प्रगतीनगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, गवळीपुरा येथील १, वनदेवी नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, भामदेवी येथील १, दापुरा येथील १, धनज येथील ७, हिवरा लाहे येथील १, कामरगाव येथील ४, कसगाव येथील १, पारवा कोहर येथील १, पिंपळगाव येथील १, आखतवाडा पीएनसी कॅम्प येथील २, रहाटी येथील १, शहा येथील १, सिरसोळी येथील १, वाई येथील १, धामणी खडी येथील १, जांब येथील १, पोहा येथील १, यावर्डी येथील १, रिसोड शहरातील १, दापुरी येथील १, मसलापेन येथील १, मोठेगाव येथील १ आदींचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा ८,२४० वर पोहोचला आहे.
८९० जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२४० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ७,१९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला असून सद्य:स्थितीत ८९० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.