वाशिममध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 01:17 PM2021-04-19T13:17:15+5:302021-04-19T13:17:55+5:30

Washim News : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा

Essential services will be available in Washim from 9 am to 1 pm | वाशिममध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा

वाशिममध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा

googlenewsNext
ंचारबंदीचा सुधारीत आदेश जारी : दवाखाने, मेडीकल्स २४ तास सुरू राहणारवाशिम : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला असून, जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीचा सुधारीत आदेश १८ एप्रिलला जारी केला असून, त्यानुसार दवाखाने, मेडीकल्स वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. त्यानंत दुकाने उघडी ठेवल्यास कोविड-१९ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदी लागू असतानाही, अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने परिस्थिती जैसे थे होती. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी कठोर पाऊल उचलत संचारबंदीच्या नियमात बदल करीत सुधारीत आदेश जारी केला. या आदेशानुसार मेडीकल व दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील उर्वरीत सर्व दुकाने केवळ चार तासांसाठी सुरू ठेवता येणार आहेत तर दुसरीकडे अत्यावश्यक बाबीतील सर्व हार्डवेअर्सची दुकाने व कृषि संबंधित सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषि संबंधित साहित्याची आवश्यकता असेल त्यांनी संबंधित दुकानदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे मागणी नोंदवून संबंधित ग्राहकाने स्वत: ही वस्तू दुकानातून घेवून जावी. केवळ त्या वेळेपुरते दुकान उघडता येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत दुकानदार यांनी दुकानातून मालाची विक्री करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दजार्पेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. नागरिकांनी संचारबंदीच्या सुधारीत आदेशाचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले. दूध संकलन व विक्रीला मुभा दुध संकलन व विक्रीकरिता सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मुभा राहील. दुध व्यावसायिकांना दुध वितरणासाठी सकाळी ८ पूर्वी शहरामध्ये येता येईल, तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर घरी जावू शकतील. मात्र त्यांच्याकडे दुधाची कॅन सोबत असणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये २४ तास सुरूआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा, नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीची कार्यालये २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यातील इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहतील. शहरातील पेट्रोलपंप चार तास सुरू राहतील !शहरातील व गावातील पेट्रोलपंप सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. हायवेवर शहराबाहेर व गावाबाहेर असलेले पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. खाजगी वाहतूक सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहील. सार्वजनिक वाहतूक नियमितपणे सुरु राहील. प्रतिबंधित क्षेत्रातील इतर दुकाने बंद !प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व फळांची दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने बंद राहतील. परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांना १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

Web Title: Essential services will be available in Washim from 9 am to 1 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.