वाशिम तालुक्यात ७९ ‘रिचार्ज पीट’ची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:44+5:302021-08-24T04:45:44+5:30
नीती आयोगाकडून जिल्ह्यात विविध स्वरूपातील विकासकामे प्रस्तावित आहेत. पाणीपातळी खालावलेल्या पाणलोट क्षेत्रात ‘रिचार्ज पीट’ची कामे करण्याचेही नियोजन या माध्यमातून ...
नीती आयोगाकडून जिल्ह्यात विविध स्वरूपातील विकासकामे प्रस्तावित आहेत. पाणीपातळी खालावलेल्या पाणलोट क्षेत्रात ‘रिचार्ज पीट’ची कामे करण्याचेही नियोजन या माध्यमातून करण्यात आले. त्यानुसार, गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले होते. यामुळे उन्हाळ्यातही शेतातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दमदार राहिली. त्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांनी उत्साह दाखविल्याने भूजल सर्वेक्षण विभागाच्या चमूने क्षेत्रीय तपासणीची कामे वेळेत पूर्ण करून ७० शेतकऱ्यांना सहकार्य केले. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ६९; तर त्यानंतर १० असे एकूण ७९ ‘रिचार्ज पीट’ची कामे पूर्ण झाली.
........................
कोट :
‘रिचार्ज पीट’ उभारण्याची योजना यशस्वी होण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंधारण, कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनीही उत्साह दाखवून स्वत:च्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेतले. यामुळे जलस्रोतांची पातळी वाढली असून प्रत्यक्ष फायदा रब्बी हंगामात दिसून येणार आहे.
- सुनील कडू, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, वाशिम