वाशिम जिल्हय़ात नवदुर्गेची हर्षाेल्हासात स्थापना

By admin | Published: October 14, 2015 02:06 AM2015-10-14T02:06:12+5:302015-10-14T02:06:12+5:30

४७५ दुर्गोत्सव मंडळ; सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ...

Establishment of Navadurga's Harshhalishas in Washim District | वाशिम जिल्हय़ात नवदुर्गेची हर्षाेल्हासात स्थापना

वाशिम जिल्हय़ात नवदुर्गेची हर्षाेल्हासात स्थापना

Next

वाशिम : 'उदे ग अंबे उदे..' म्हणत घटस्थापनेने वाशिम जिल्हय़ात नवरात्रोत्सवाला थाटात सुरुवात झाली. पावित्र्य, मांगल्य अन् उत्साहाचे प्रतीक असलेल्या नवदुर्गेची हर्षोल्हासात स्थापना झाली. गणेशोत्सवादरम्यानचा उत्साह ओसरत नाही, तोच नवदुर्गेचे मंगळवारी आगमन झाल्याने भक्तांच्या आनंदाला उधाण आले आहे. ढोलताशांच्या निनादात नवदुर्गेचे जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले असून, नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यावर्षी शहर व ग्रामीण भागात एकूण ४७५ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची स्थापना झाली. गतवर्षी ४७४ दुर्गोत्सव मंडळांची स्थापना झाली होती. यावर्षी कारंजा तालुक्यात सर्वाधिक अर्थात ११४ दुर्गोत्सव मंडळांची स्थापना झाली. वाशिम शहर पोलीस स्टेशनांतर्गत ४३, वाशिम ग्रामीण २७, रिसोड ४८, मालेगाव ५३, शिरपूर ३५, मंगरुळपीर ४८, आसेगाव २४, अनसिंग ११, जऊळका २५, कारंजा शहर २९, कारंजा ग्रामीण ५४, मानोरा ४७, धनज ३१ अशा एकूण ४७५ दुर्गोत्सव मंडळांची जिल्हय़ात स्थापना झाली. दुर्गोत्सव काळात युवक-युवतींमध्ये खास आकर्षण असलेल्या दांडियाची धूम राहणार आहे. . मंगळवारी वाशिम शहरासह जिल्हय़ात नवदुर्गेचे उत्साहात, ढोलताशाच्या गजरात सायंकाळपर्यंत आगमन झाले. बच्चे कंपनीने ढोलताशाच्या गजरात माँ दुर्गेचे स्वागत केले. जिल्हाभरात शारदादेवीची विधीवत पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली. सायंकाळपर्यंत दुर्गोत्सवाच्या स्थापनेचे काम विविध ठिकाणी सुरू होते. वाशिम, कारंजा रिसोड, मानोरा, मालेगाव, मंगरुळपीर आदी शहरांसह अनसिंग, शिरपूर, कामरगाव, शेलूबाजार अशा गावांमधील बाजारपेठा माँ दुर्गेच्या उत्सवासाठी लागणार्‍या साहित्याच्या दुकानांनी सजलेल्या होत्या. .

Web Title: Establishment of Navadurga's Harshhalishas in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.