‘अपेडा फार्मर कनेक्ट अॅप’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 07:58 PM2017-10-03T19:58:01+5:302017-10-03T20:01:39+5:30
वाशिम : निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळबाग आणि भेंडी, कारली, भोपळा, मिरची, तोंडले, शेवगा, कडीपत्ता आदी १५ प्रकारच्या भाजीपाला पिकाची नोंद करण्यासाठी ‘अपेडा’ने अपेडा फार्मर कनेक्ट अॅप तयार केले असून शेतकºयांना स्वत: मोबाईलवरून नोंदणी करणे यामुळे शक्य झाले आहे. दरम्यान, या ‘अॅप’वर नोंदणीसाठी शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी मंगळवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

निर्यातक्षम डाळिंब पिकाची नोंदणी ‘अपेडा फार्मर कनेक्ट अॅप’, आपले सरकार पोर्टल व पूर्वीप्रमाणे कृषि विभागामार्फत ‘अपेडा’च्या संकेतस्थळावर देखील करता येऊ शकते. सन २०१६-१७ या वर्षात ‘अनारनेट’ प्रणालीवर ९४ डाळिंब प्लॉटची नोंदणी झालेली होती. सन २०१७-१८ मध्ये वाशिम जिल्ह्यासाठी डाळिंब नोंदणीचे २५० हेक्टर प्लॉट नोंदणीचे उद्दिष्ट प्राप्त आहे. ही नोंदणी २१ सप्टेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार असल्याचेही गावसाने यांनी कळविले आहे.