विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कारवाईनंतरही धनज पोलीस स्टेशन अंतर्गत वरली मटका जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:35+5:302021-06-29T04:27:35+5:30

तालुक्यातील ग्राम हिवरा लाहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री, वरली मटका जोरात सुरू असतानाही पोलीस उपविभागीय अधिकारी ...

Even after the action of Special Inspector General of Police, Worli Matka is loud under Dhanaj police station | विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कारवाईनंतरही धनज पोलीस स्टेशन अंतर्गत वरली मटका जोरात

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कारवाईनंतरही धनज पोलीस स्टेशन अंतर्गत वरली मटका जोरात

googlenewsNext

तालुक्यातील ग्राम हिवरा लाहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री, वरली मटका जोरात सुरू असतानाही पोलीस उपविभागीय अधिकारी तथा धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांचे दुर्लक्ष आहे. याबाबत हिवरा लाहे येथील सरपंच सागर ढेरे यांनी २७ जून रोजी गावात वरली मटका सुरू असल्याची पुराव्यानिशी तक्रार बिट जमादार यांच्याकडे केली. त्यावर उलट बिट जमादार रामटेके यांनी तुम्ही वाळू तस्करीचा व्यवसाय करता, असा आरोप करीत उलट सरपंच यांच्यावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारंजा शहरात व ग्रामीण परिसरात कार्यवाही होऊन अवैध धंदे थांबवले जातात; मग ग्रामीण भागातील धनज बु., दोनद, कामरगाव, हिवरा लाहे तसेच अमरावती, वाशिम सीमेवर जोरात वरली मटका खुलेआम सुरू आहे. याला जबाबदार कोण, त्यांच्यावर कार्यवाही होणार का, असा प्रश्न सागर ढेरे यांनी उपस्थित करून जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना कारवाई करतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Even after the action of Special Inspector General of Police, Worli Matka is loud under Dhanaj police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.