प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील सिनेमागृह बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 03:33 PM2020-11-11T15:33:33+5:302020-11-11T15:37:34+5:30

तीन दिवसाचा कालावधी उलटला असून, अद्याप दोन्ही सिनेमागृह सुरू झाले नाही.

Even after getting permission from the administration, cinema in Washim district remained closed | प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील सिनेमागृह बंदच

प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील सिनेमागृह बंदच

Next
ठळक मुद्देसिनेमागृह सुरू कधी होणार याकडे  प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.जिल्हा प्रशासनाने ७ नोव्हेंबरला परवानगीसंदर्भात आदेश जारी केले.

n  लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ५० टक्के क्षमतेसह सिनेमागृह सुरु करण्यास शासन, प्रशासनाकडून परवानगी मिळाली असली तरी जिल्ह्यातील दोन्ही सिनेमागृह अद्याप सुरू झाले नाही. सिनेमागृह सुरू कधी होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने, हा ससंर्ग रोखण्यासाठी  २३ मार्चला केंद्र शासनाने ‘लाॅकडाऊन’चे आदेश जारी केले. तेव्हापासून जिल्ह्यातील सिनेमागृह बंद होते. लाॅकडाऊनमुळे नवीन चित्रपट निर्मितीदेखील बंद असल्याने दिवाळीदरम्यान नवीन चित्रपट येणार नाहीत. अनलाॅकच्या टप्प्यात लाॅकडाऊनमध्ये बरीच शिथिलता मिळत आहे. दरम्यान, सिनेमागृह सुरू करण्यास राज्य शासनाने ३ नोव्हेंबरला तर जिल्हा प्रशासनाने ७ नोव्हेंबरला परवानगीसंदर्भात आदेश जारी केले. परवानगी मिळून तीन दिवसाचा कालावधी उलटला असून, अद्याप दोन्ही सिनेमागृह सुरू झाले नाही. सिनेमागृह सुरू कधी होणार याकडे  प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.


यंदाच्या दिवाळीत जूनेच सिनेेमे दाखविणार 
जिल्ह्यात परवानगी मिळाली असली तरी अद्याप सिनेमागृह सुरू झाले नाहीत. दोन, तीन दिवसात सिनेमागृह सुरू होइल, असे सांगितले जात आहे. कोरोनामुळे नवीन चित्रपटांचे चित्रिकरण होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा दिवाळीदरम्यान प्रेक्षकांना जूनेच सिनेेमे पाहावे लागणार आहेत, असे बोलले जात आहे. 

Web Title: Even after getting permission from the administration, cinema in Washim district remained closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.