पेरणीनंतरही जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:38 PM2020-08-05T12:38:10+5:302020-08-05T12:38:48+5:30
महिनाभरात पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्के वाढ होऊ शकली आहे.
वाशिम : यंदाचा खरीप हंगाम अर्धा उलटला असतानाही ३१ जुलैपर्यंत केवळ ५५५ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांच्यो पीककर्जाचे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकले. त्यातही महिनाभरात पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्के वाढ होऊ शकली आहे. पीककर्जासाठी पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ लाभार्थींपैकी ३१ जुलैपर्यंत ७६ हजार ३९७ शेतकºयांना ५५५ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले. अद्यापही जिल्ह्यात ३८ हजार ७८१ शेतकºयांना पीककर्ज मिळू शकले नाही.
यंदा ३१ जुलैपर्यंत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३४.७६ टक्के पीककर्जाचे वितरण होऊ शकले आहे. विशेष म्हणजे गत महिनाभरात केवळ पीककर्ज वाटपात केवळ ३.७६ टक्क्यांची वाढ होऊ शकली आहे. कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पात्र आहेत. यात महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. या योजनेतील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे होते. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला. तथापि, १८ जून रोजी जिल्ह्यात पुन्हा आधार प्रमाणीकरण प्रक्रिय सुरू होऊन हजारो शेतकºयांनी आधार प्रमाणीकरणही केले. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढणे अपेक्षीत होते; परंतु ३१ जुलैपर्यंतही निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३४.७१ टक्के पीककर्ज वाटप जिल्ह्यात होऊ शकले आहे. त्यात ७६ हजार ३९७ शेतकºयांच्या खात्यात ५५५ कोटी ४१ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे.
जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पीककर्ज वितरण वेगाने करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व बँकांना सुचना देण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे बँकांना अडचणी येत असल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. तथापि, शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेऊन पर्याय शोधून शेतकºयांना पीककर्ज वितरणास वेग देण्यात येईल.
- रवि गडेकर, जिल्हा उपनिबंधक