मोबाईलच्या जमान्यातही लँडलाईनची ‘ट्रिंग ट्रिंग’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:21+5:302021-09-03T04:44:21+5:30

साधारणत: सन २०१० पूर्वी प्रत्येक शहरासह खेड्यापाड्यांतही कुणाशी संवाद साधायचा झाल्यास लँडलाईनचाच सर्रास वापर केला जायचा. एसटीडी आणि कॉइनबॉक्सच्या ...

Even in the age of mobile, the 'tring tring' of the landline remains | मोबाईलच्या जमान्यातही लँडलाईनची ‘ट्रिंग ट्रिंग’ कायम

मोबाईलच्या जमान्यातही लँडलाईनची ‘ट्रिंग ट्रिंग’ कायम

Next

साधारणत: सन २०१० पूर्वी प्रत्येक शहरासह खेड्यापाड्यांतही कुणाशी संवाद साधायचा झाल्यास लँडलाईनचाच सर्रास वापर केला जायचा. एसटीडी आणि कॉइनबॉक्सच्या माध्यमातून हे दूरध्वनी संच प्रत्येक ठिकाणी पोहोचले. त्यानंतरच्या काळात मात्र झालेल्या मोबाईल क्रांतीने दळणवळण सोपे झाले. बहुतांश नागरिकांच्या हातात मोबाईल आल्याने घरांमध्ये लावून असलेले लँडलाईन आजमितीस कालबाह्य ठरले. त्यासोबतच कॉइनबॉक्सही हद्दपार झाले आहेत.

...............

केवळ पाच हजार लँडलाईन

जिल्ह्यात कधीकाळी ५० हजारांपेक्षा अधिक लँडलाईन फोन कार्यान्वित होते. मोबाईलचा वापर जसजसा वाढत गेला, तसतशी लँडलाईन वापरकर्त्यांची संख्याही घटत गेली. सध्या जिल्ह्यात केवळ पाच हजारांच्या आसपास लँडलाईन फोन कार्यान्वित आहेत.

.................

‘कॉइनबॉक्स’ कुठेच दिसेना

जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी बाजारपेठेतील छोट्या-मोठ्या दुकानांसमोरही ‘कॉइनबॉक्स’ लावलेले दिसायचे. त्यात एक मिनिटाच्या संवादासाठी एक रुपयाचे नाणे टाकून संबंधितांशी गप्पा मारताना अनेकजण दिसून यायचे. कालांतराने मात्र ही क्रेझ कमी झाली. आता तर कुठेच ‘कॉइनबॉक्स’ दिसत नाहीत, अशी स्थिती आहे.

...............

एसटीडी बूथही कालबाह्य

‘कॉइनबॉक्स’ येण्यापूर्वी ठिकठिकाणी एसटीडी बूथ दिसून यायचे. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे एसटीडी बूथही कालबाह्य ठरायला लागले. आजमितीस जिल्ह्यात असे बूथ कालबाह्य ठरले असून मोबाईलचाच सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे एसटीडी बूथचा व्यवसाय पूर्णत: बंद पडला आहे.

................

म्हणून लँडलाईन आवश्यकच

आमच्या घरी फार पूर्वीपासून लँडलाईन फोन आहे. मोबाईल क्रांती होण्यापूर्वी आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाइकांशी संवाद साधण्याचे तेच प्रमुख साधन होते. लँडलाईनशी वेगळे नाते असल्याने त्याची आवश्यकता वाटते.

- केशवराव गोटे

...............

आजमितीस घरातील प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला असला तरी घराची शोभा लँडलाईन फोनमुळेच वाढते. हल्ली त्यावर कुणाचाही फोन येत नाही; मात्र यामुळे हा फोन गुंडाळून भंगारात टाकणे मनाला पटले नाही.

- दिलीप मुठाळ

Web Title: Even in the age of mobile, the 'tring tring' of the landline remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.