‘अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील सीमा ‘लॉक’च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:16+5:302021-06-09T04:51:16+5:30

भर जहॉंगिर : अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली असली ...

Even in 'Unlock', the border in rural areas is 'locked'! | ‘अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील सीमा ‘लॉक’च !

‘अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील सीमा ‘लॉक’च !

Next

भर जहॉंगिर : अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी, ग्रामीण भागातील सीमा अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या रस्त्यावरून दिसून येते.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या होत्या. नजीकच्या हिंगोली, परभणी, बुलडाणा जिल्ह्यांतून येणारे रस्ते स्थानिक पोलीसपाटील, तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायतीने सीमेवरील रस्त्यावर दगड, मुरूम, झाडाच्या फांद्या टाकून बंद केल्या होत्या. यादरम्यान या सीमेजवळील भागातील गावांच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. साखरा, केलसुला, ब्राह्मणी, कापडसिंगी, रायगाव सावरगाव, गांधारी, शिवणी जाट, देऊळगाव, सोनुना, वढव, हिरडव, आरडव, पहुर, दाभा अशा विविध गावांतील नागरिकांना त्यांच्या स्वजिल्ह्यापेक्षा रिसोड, वाशिम बाजारपेठ जवळ आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त तसेच साहित्य, माल खरेदीसाठी या गावातील नागरिक हे रिसोड, वाशिमला जातात. जिल्हा सीमावर्ती भागामध्ये काही गावांनी थेट जिल्हा सीमाच बंद केल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला. दरम्यान, ७ जूनपासून अनलॉकच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाल्याने जिल्हा सीमावर्ती भागातील रस्तेही मोकळे होणे अपेक्षित आहे. मात्र, मोहजाबंदी-लोणी-वढव या रस्त्यावर अजूनही मुरूम, झाडाच्या फांद्या जैसे थे असल्याने हा मार्ग बंदच आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

...

कोट बॉक्स

मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर दगड, मुरूम टाकून मुख्य रस्ताच बंद केल्याने या भागातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा. गांधारी गाव हे लोणार तालुक्यामध्ये आहे. परंतु आम्हाला मुख्य बाजारपेठ रिसोड जवळ आहे. आतातरी बंद केलेले रस्ते पूर्ववत करावे.

अ‍ॅड. शिवाजी सानप,

सामाजिक कार्यकर्ते, गांधारी

.....

रस्त्यावरील मुरूम केव्हा हटविणार?

कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर तरी मोहजाबंदी, चिचांबाभर, गांधारी, वढव येथील रस्त्यावरील टाकलेला मुरूम हटविणे आवश्यक आहे. याकडे संबंधित ग्रामपंचायत तसेच तालुका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Even in 'Unlock', the border in rural areas is 'locked'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.