अखेर शहापुरात टँकर सुरु ; पायपिट थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:39 PM2018-05-12T16:39:37+5:302018-05-12T16:39:37+5:30
शहापुरात भिषण पाणीटचाई ,अशा आशयाची बातमी ११ मे रोजी लोकमतने प्रसिध्द करताच प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन १२ मे रोजी शहापुर व नवीन सोनखास भागात १२ हजार लीटर पाणी क्षमतेचे टॅकर सुरु केले.
वाशिम : मंगरुळपीर शहरालगत असलेल्या गटग्रामपंचायत जांब अंतर्गत येत असलेल्या शहापुर,सोनखास मधील ग्रामस्थांना गेली दोन महीण्यापासुन भिषण पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. शहापुरात भिषण पाणीटचाई ,अशा आशयाची बातमी ११ मे रोजी लोकमतने प्रसिध्द करताच प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन १२ मे रोजी शहापुर व नवीन सोनखास भागात १२ हजार लीटर पाणी क्षमतेचे टॅकर सुरु केले.
शहापुर व नवीन सोनखास ही दोन गावे शहरालगत असुन या गावामध्ये या गावामध्ये भिषण पाणी टंचाईशी सामना करावा लागत होता. परिणामी ग्रामस्थाना सर्व कामे बाजुला सारुन पाण्यासाठी वणवण भंटकती करावी लागत होती. ग्रामस्थाची पाण्यासाठी होत असलेली ससेहालपट लक्षात घेउन लोकमत मध्ये वृत्त प्रकाशीत केले वृत्त प्रकाशीत होताच दुसऱ्या दिवसापासुन प्रशासनाच्या वतीने टॅकर सुरु केले . या भागात हातपंप आहेत परंतुसध्यास्थितीत भुजल पातळीत कमालीची घट झाल्यामुळे ते कोरडे पडले आहे तसेच या भागात काही ग्रामस्थाकडे बोअरवेल आहेत परंतु तेही कोरडे पडल्याने ग्रामस्थाना टॅकरने पाणी विकत घ्यावे लागत होते . ज्याचेकडे पैसा आहेत ते पाणी विकत घेत होते परंतु ज्याची आर्थीक परिस्थीती अत्यंत्य हलाखीची असल्यामुळे त्यांना दुरवरुन पाणी आणाल्याशिवाय पर्यायच नव्हता अशा विपरीत परिस्थीती लक्षात घेउन येथील सरपंच साहेबराव भगत व उपसरपंच व सदस्यानी पुढाकार घेऊन काही भागात मोफत पाणी टॅकर सुरु केले होते; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत मोफत पाणी टॅकरचे पाणी पुरविण्याचे प्रयत्न तोकडे पडत होते. आतामात्र टॅकर सुरु झाल्याने मुबलक पाणी मिळत आहे.