प्रत्येकाने वनसाक्षर होणे गरजेचे - मृण्मयी हातोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:43 PM2020-02-08T13:43:29+5:302020-02-08T13:48:53+5:30

पर्यावरण मित्र परिवाराच्या अध्यक्ष व युवा पर्यावरण अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

Everybody needs to be forest literaturate - Mrunmayi Hatolkar | प्रत्येकाने वनसाक्षर होणे गरजेचे - मृण्मयी हातोलकर

प्रत्येकाने वनसाक्षर होणे गरजेचे - मृण्मयी हातोलकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : समाजात वावरणाºया प्रत्येक नागरिकाने वनसाक्षरण होणे गरजेचे आहे. घराघरातून, शाळा-महाविद्यालयांमधून पर्यावरणाप्रती कर्तव्याचा संस्कार तळागाळात पोहचणे काळाची गरज आहे, याबद्दल आग्रही भुमिका ठेऊन कार्य करित असलेल्या मंगरूळपीर येथील पर्यावरण मित्र परिवाराच्या अध्यक्ष व युवा पर्यावरण अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

वृक्षलागवड वाढण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ?
ज्याठिकाणी वृक्षलागवड करायची, तिथे पाण्याची मुबलक सोय असणे गरजेचे आहे. मातीचा थर वाहून गेलेल्या डोंगरावर तसेच खडकाळ जमिनीवर झाडे लावण्यासाठी व ती जगविण्यासाठी मृदा संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे माती अडवा, पाणी मुरवा, झाडे जगवा ही त्रिसूत्री असलेला मृदा जल व वन संवर्धन कार्यक्रम लोकसहभागातून राबविला तरच वृक्षलागवड यशस्वी होऊ शकते.

वनक्षेत्र घटल्याने कोणते दुष्परिणाम होतात ?
शेती, शहरीकरण आणि रस्त्यांमुळे वनक्षेत्रात घट झाली आहे. निसर्गाची कार्बन पचविण्याची क्षमता देखील यामुळे घटली. कार्बन उत्सर्ग घटविण्याच्या आणि कार्बन क्षमता वाढविण्याच्या कार्यात वनस्पतीची भूमिका खात्रीशील व अल्पखर्चीक मानली जाते. त्यामुळे जंगले वाचविण्याचा जगभर प्रयत्न होत आहे. असे असले तरी जंगलाचे मुख्य मात्र कुणीही समजून घेत नाही. ते समजून घेतले तर जंगल संवर्धनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण अधिक सकारात्मक होईल.

जंगलाचे मुल्य म्हणजे काय ?
लाकूड आणि लाकूडेत्तर वस्तूंचा पुरवठा, कार्बन शोषण आणि वन्यजिवांचा अधिवास याव्यतिरिक्त निसर्गाला जंगल परिसंस्थामधून अनेक जीवनावश्यक सेवा मिळतात. ज्या सेवामुळे पृथ्वीला सजीव सृष्टी पोसण्याची क्षमता प्राप्त होते. या सेवा जीवनावश्यक असून त्याचे मुल्यांकन झाले तरच लोकांना जंगलाचे महत्व कळणार आहे.

तुम्ही पर्यावरणविषयक करित असलेली कार्य कोणती ?
पर्यावरणास पुरक व अनूकुल गावे, शहरे विकसीत होण्यासाठी तसा संकल्प करून घराघरात व शाळा-महाविद्यालयात, ग्रामपंचायत, महिला व युवा मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीचे काम केले जात आहे. त्यात पर्यावरण विषयक कार्यशाळा, निसर्ग सहली, निसर्ग शिबिरे, पर्यावरणाचे पुनरूज्जीवन, जैवविविधता संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रमांचा समावेश आहे.

समाजाकडून काय अपेक्षा आहेत ?
प्रत्येक माणूस हा वनसाक्षर झाला पाहिजे, त्यासाठी नव्या व जुन्या पिढीत पर्यावरणाप्रती संस्कार रुजणे आवश्यक आहे. धर्म, राजकारण, अर्थकारणापेक्षाही अधिक महत्व पर्यावरणाला देणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येकाने याबाबत सजग असायला हवे, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Everybody needs to be forest literaturate - Mrunmayi Hatolkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.