ews शिरपूर जैन: ५० % पेक्षा अधिक आरक्षण झाल्याचा क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:37+5:302021-03-24T04:39:37+5:30
News शिरपूर जैन: ५० % पेक्षा अधिक आरक्षण झाल्याच्या कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद, पंचायत समितीतील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व ...
News
शिरपूर जैन: ५० % पेक्षा अधिक आरक्षण झाल्याच्या कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद, पंचायत समितीतील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यामध्ये शिरपूर भाग दोनचा पं. स. सदस्य मरियबी रेघीवाले यांचेही सदस्यत्व रद्द झाले. मंगळवारी काढण्यात आलेल्या आरक्षणात भाग दोनच्या जागेचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने पंचायत समिती सदस्य पदासाठी होणारी निवडणूक चुरशीची होणार. जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये ५०% अधिक आरक्षण झाल्याची याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यामध्ये शिरपूर भाग दोनचे पंचायत समिती सदस्य मरियम बि सलीम रेघीवाले यांचे पदही रद्द झाले. रद्द झालेल्या मालेगाव पंचायत समिती सदस्य निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये शिरपूर भाग दोन पंचायत समिती सदस्यपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याचे आरक्षण सोडतीतून निघाले. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत आता होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. निवडणूक कॉंग्रेस, विरुद्ध भाजपा व शिवसेना युती करून लढेल किंवा तिरंगी लढत होऊ शकते तसेच अपक्ष उमेदवार संख्या वाढवू शकतात. मागील निवडणुकीत ओबीसी महिला आरक्षण होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या मरियम बी यांनी भाजपा, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. भाग दोनमध्ये शिरपूर येथील वाॅर्ड नं दोन, तीन, सहा, चारचा समावेश आहे. मात्र या होणाऱ्या निवडणुकांमधून ओबीसी आरक्षण हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळेल.