ढोरखेड्यातील माजी अपंग सैनिकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:40+5:302021-02-05T09:21:40+5:30
मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील रहिवासी असलेले नारायण इढोळे हे १९८९ मध्ये भारतीय सैन्यात मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. ...
मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील रहिवासी असलेले नारायण इढोळे हे १९८९ मध्ये भारतीय सैन्यात मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. १९९२ मध्ये भारत- चीन सीमेवरचा लद्दाख येथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी नारायण ईढोळे हे शत्रूशी लढताना जखमी होऊन अपंग झाले होते. त्यांच्यासोबत इतर काही सैनिकांना अपंगत्व आले होते. भारतीय सैन्याकडून त्या शूर सैनिकांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. यामध्ये ढोरखेडा येथील नारायण ईढोळे यांचाही मुंबई येथे लेफ्टनंट कर्नल पाराशर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नारायण ईढोळे यांना एक लाख रुपयांचा धनादेश व पंचवीस हजार रुपये किमतीच्या भेटवस्तू देण्यात आल्या. सद्य:स्थितीत ईढोळे हे शिरपूर महसूल मंडळांतर्गत तलाठी म्हणून कार्यरत आहेत.