मोफत शिकवणीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:00 PM2019-01-13T13:00:07+5:302019-01-13T13:00:16+5:30

रिसोड (वाशिम) - आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य कोर्सेसची पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्थानिक डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळेत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ ही परीक्षा १३ जानेवारी रोजी घेण्यात आली.

exam of students for Free Tutorial | मोफत शिकवणीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा !

मोफत शिकवणीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) - आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य कोर्सेसची पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्थानिक डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळेत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ ही परीक्षा १३ जानेवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेला इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थी समाविष्ठ झाले होते.
इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षांची माहिती देणे, तयारी करून घेण्यासाठी ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ या उपक्रमांतर्गत परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाते. सदर परीक्षेसाठी डॉक्टर अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळा रिसोड हे परीक्षा केंद्र दरवर्षी नियोजित असते. रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स वाशिम जिल्ह्याचे समन्वयक म्हणून डॉ. वकार मोहसिन यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड, मेहकर, डोणगाव, साखरखेर्डा, शिरपुर ,वाशिम, बुलडाणा, चिखली येथील एकूण ८५ विद्यार्थी परीक्षेला समाविष्ट असून त्यापैकी एकूण ८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा परीक्षा सुरू होण्यापूर्वी शाळेचे अध्यक्ष अल्हाद कबीर मोहसिन तसेच शाळेचे सचिव व रहमानी थर्टी परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. वकार मोहसिन, मुख्याध्यापक जमीर अहमद खान यांनी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स’ची उपयोगिता याबद्दल माहिती दिली. पर्यवेक्षक म्हणून शाळेतील शिक्षक जाकिर मोहम्मद शेख, शेख समीर, इरशाद अहमद, शेख आसिफ, मोहम्मद आकीब, सईद खान, मोईन रजा, मोहम्मद सादिक यांनी कामकाज पाहिले. शिक्षकेतर कर्मचारी शेख इमदाद, कैसर खान आदींनी सहकार्य केले.

Web Title: exam of students for Free Tutorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.