मानसिक आरोग्य शिबीरात २८० रुग्णांची तपासणी    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:42 PM2019-04-01T16:42:08+5:302019-04-01T16:42:24+5:30

मंगरुळपीर (वाशिम): जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात १ एप्रिल रोजी २८० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

Examination of 280 patients in Mental Health Camp | मानसिक आरोग्य शिबीरात २८० रुग्णांची तपासणी    

मानसिक आरोग्य शिबीरात २८० रुग्णांची तपासणी    

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात १ एप्रिल रोजी २८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम व ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर यांच्यावतीने हे शिबीर घेण्यात आले. 
शिबिरापूर्वी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ चव्हाण होते तर उदघाटक म्हणून वाशीम येथील मानसोपचार तज्ञ डॉ. रवी अवचार तर डॉ जाधव,डॉ राऊत,डॉ इंगळे,डॉ अजमल, डॉ तिडके, डॉ लांजेवार, सल्लागार समिती सदस्य डिगांबर भोयर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, देशात नैराश्याने दररोज एका व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे प्रत्येकाने मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे. ज्या रुग्णांना मानसिक आजार आहे. अशांनी ग्रामीण रुग्णालयात यावर मोफत उपचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले, तसेच मानसिक आजारासाठी ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार, समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन मार्गदर्शन, व्यसनाधीनता औषधोपचार मार्गदर्शन, सकारात्मक मानसिकता समुपदेशन, उच्च श्रेणी दवाखान्यात संदर्भीत करण्याची व्यवस्था आदि सुविधा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. या शिबिरात एकूण २८० रुग्णांची तपासणी करण्यात आली असता यापैकी ६९ मानसिक रुग्ण आढळून आल्याने त्यांचेवर उपचार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ रमेश आडे यांनी, तर प्रास्ताविक डॉ तिडके यांनी केले. यावेळी रुग्णासह रुग्णालयाच्या कर्मचाºयांची उपस्थिती होती.

Web Title: Examination of 280 patients in Mental Health Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.