सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:46+5:302021-07-07T04:51:46+5:30
^^^^^^^^^ गावांतील हातपंप बंद वाशिम: तालुक्यातील ग्रामीण भागांतील काही गावांतील हातपंप मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना हांतपंपावर ...
^^^^^^^^^
गावांतील हातपंप बंद
वाशिम: तालुक्यातील ग्रामीण भागांतील काही गावांतील हातपंप मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना हांतपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून हे हातपंप दुरुस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याची दखल घेण्यात येत नाही.
-------------------------
काजळेश्वर परिसरात अनियमित वीजपुरवठा
काजळेश्वर: परिसरातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे घरातील पंखे बंद राहत असल्याने डासांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
^^^^^^^^^^
अडाण प्रकल्पाची पातळी ४५ टक्क्यांवर
वाशिम: पावसाळा सुरू होऊन दीड महिनाही झाला नसताना, मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पात ४५ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे पुढच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
----
कठडे नसलेल्या पुलामुळे अपघाताची भीती
वाशिम : मालेगाव तालुक्यातील अमानी ते पांगरी रस्त्यादरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे नाल्यास पूर आल्यावर या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असून, येथे अपघाताची भीतीही वाढली आहे.
-------
आसेगाव येथे पसरली अस्वच्छता
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथे पावसामुळे साचलेल्या गटाराने अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आसेगाव येथे अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी पडून गटारे साचतात.