ऑनलाईन शिक्षण असतानाही भरमसाठ फी वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:30+5:302021-06-20T04:27:30+5:30

कोरोना संसर्गामुळे शाळांमधील किलबिलाट यंदाही ऐकायला मिळणार नाही. विदर्भातील शाळांचे सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे. यात वाशिम जिल्ह्यातील ...

Excessive fees charged despite online education! | ऑनलाईन शिक्षण असतानाही भरमसाठ फी वसुली!

ऑनलाईन शिक्षण असतानाही भरमसाठ फी वसुली!

Next

कोरोना संसर्गामुळे शाळांमधील किलबिलाट यंदाही ऐकायला मिळणार नाही. विदर्भातील शाळांचे सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शाळांचाही समावेश आहे. इंग्रजी माध्यमाच्या काही खासगी शाळा मात्र ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची लगबग सुरू आहे. आता कोरोनामुळे यंदाही विद्यार्थ्यांसाठी शाळा भरणार नसून, ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शाळांचा खर्च कमी होणार आहे; परंतु ऑनलाईन शाळा असतानाही नावापुरती कपात करून नियमित शाळेप्रमाणेच भरमसाठ फी घेतली जात असून, ऑनलाईन शाळा असतानाही फी तेवढीच कशी काय, असे प्रश्न अनेक पालकांना पडले आहेत.

---------------

बॉक्स : ऑनलाईनमुळे असा वाचतो शाळांचा खर्च -

ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे शाळांचा वीजबिल, पाणीबिल, सफाई खर्च, सुरक्षेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. याबरोबरच अनेक खासगी शाळा वाहतूक, लॅब फी, लायब्ररी फीचा खर्चही मुलांकडून वसूल करतात.

---------

१०० टक्के शुल्क कशासाठी

१) कोट : आधीच खासगी शाळांचे शुल्क आवाक्याबाहेर आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने शाळांनी निम्मे शुल्क तरी कमी करावे; परंतु असा पुढाकार त्यांच्याकडून घेतला जात नाही.

- राजेश परसुवाले, पालक.

------

२) कोट : पूर्वी सकाळी ११ ते ५ अशी पूर्ण वेळ शाळा राहत होती; परंतु आता ऑनलाईन पद्धतीने शिकविले जाते. त्यातही शिक्षण शुल्कात अपेक्षित अशी कपात केली जात नाही. ऑनलाईनमुळे शाळेचा उत्तरपत्रिकेसह इतर खर्च वाचला आहे.

- बजरंग वानखडे, पालक.

-----

शाळा ऑनलाईन असली, तरी खर्च येतोच

१) कोट : शासनाच्या निकषानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांसाठी २५ टक्के शुल्क कमी केले आहे. त्याशिवाय नर्सरी आणि केजीचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. शाळा ऑनलाईन पद्धतीने होत असल्या तरी,

- मुकेश चरखा,

संस्थाचालक

^^^^^^^

२) कोट : शाळा ऑनलाईन असली तरी आमच्या खर्चात फारसा फरक पडला नाही. शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार, इमारतीची देखभाल, कार्यालयीन कामकाजाचा खर्च करावाच लागतो. अशातही आम्ही ३० टक्के शुल्क कपात केली आहे.

- सुनील कदम,

संस्थाचालक,

---------

-जिल्हा परिषद शाळा ७७३

-नगरपालिका शाळा -४०

-खासगी अनुदानित १८४

-खासगी विनाअनुदानित ४२२

Web Title: Excessive fees charged despite online education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.