तोरणाळा येथील दत्तजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:11+5:302021-01-08T06:11:11+5:30

तोरणाळा येथे गत २९ डिसेंबरपासून दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ३ जानेवारीपर्यंत गुरचरित्र पारायण कार्यक्रम पार पडला, ...

In the excitement of Datta Jayanti at Tornala | तोरणाळा येथील दत्तजयंती उत्साहात

तोरणाळा येथील दत्तजयंती उत्साहात

Next

तोरणाळा येथे गत २९ डिसेंबरपासून दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ३ जानेवारीपर्यंत गुरचरित्र पारायण कार्यक्रम पार पडला, तर ४ जानेवारीला रात्री महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर मंगळवार ५ जानेवारी रोजी दहीहांडी आणि माता अनुसयेची शोभायात्रा काढण्यात आली. गेल्या ५० वर्षांपासून हा कार्यक्रम साजरा केला जातो. याबाबतची एक आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार तोरणाळा गावात ५० वर्षांपूर्वी दुष्काळ, विविध समस्या, बेकारीने ग्रामस्थ वैतागले असताना गावातील एक वृद्ध पायी माहूरगडला गेले. तेथे एका संतांना त्यांनी गावातील समस्येची कथा ऐकविली. तेव्हा त्या संतांनी वृद्ध ग्रामस्थाकडे अनुसया मातेची एक मातीची मूर्ती देऊन ती गावात स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्या संताच्या सल्ल्याचे पालन करीत वृद्ध ग्रामस्थाने गावात अनुसया मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून या गावातील समस्या नाहीशा होत गेल्या. या पार्श्वभूमीवरच गावात दरवर्षी दत्तजयंती उत्सव आणि अनुसया मातेच्या शोभायात्रेचे आयोजन केले जाते.

===Photopath===

050121\05wsm_4_05012021_35.jpg

===Caption===

तोरणाळा येथील दत्तजयंती उत्साहात

Web Title: In the excitement of Datta Jayanti at Tornala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.