धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 07:23 PM2017-10-01T19:23:47+5:302017-10-01T19:25:56+5:30
वाशिम - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३० सप्टेंबर रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. स्थानिक नालंदानगर येथे शनिवार, ३० सप्टेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ८ वाजता भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर साडेआठ वाजता महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व पंचशिल त्रिशरण ग्रहण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३० सप्टेंबर रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. स्थानिक नालंदानगर येथे शनिवार, ३० सप्टेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ८ वाजता भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर साडेआठ वाजता महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व पंचशिल त्रिशरण ग्रहण करण्यात आले. सकाळी ९ वाजता शहरातून धम्मरथ रॅली काढण्यात आली. रात्री ८ वाजता ‘वर्तमान भारतातील सामाजिक समस्येवर धम्मचक्र प्रवर्तनाची गरज आणि उपाय’ या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. तसेच स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानवाच्या पुतळ्याजवळ सकाळी ७ वाजताच्या सुमारास बौद्ध बांधव व आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत महामानवाला अभिवादन केले.