समृद्धीचे काम पूर्ण करण्याची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:54 AM2021-02-27T04:54:42+5:302021-02-27T04:54:42+5:30
वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील दोनद बु.पासून ते रिसोड तालुक्यातील जनुना खु. या गावापर्यंत ५४.३५३ किलोमीटर अंतरापर्यंत ५५ गावांतून हा ...
वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील दोनद बु.पासून ते रिसोड तालुक्यातील जनुना खु. या गावापर्यंत ५४.३५३ किलोमीटर अंतरापर्यंत ५५ गावांतून हा मार्ग जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१८ पासून प्रत्यक्ष या मार्गाच्या कामास जिल्ह्यात सुरुवात झाली. एमएसआरडीसीकडे या महामार्गाच्या कामाचे नियंत्रण असून, पॅकेज ४ आणि पॅकेज ५ अंतर्गत मिळून या मार्गावर विविध प्रकारच्या २०९ संरचना तयार करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या महामार्गासाठी भूसंपादनात अडथळे आले. भूसंपादनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर कामाला सुरुवात झाली असली तरी एमएसआरडीसीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, जिल्ह्यात या महामार्गावर प्रस्तावित २०९ पैकी केवळ ८५ संरचनांची कामे पूर्ण झाली आहेत, तर अद्यापही उड्डाणपूल, प्रमुख पूल, आरओबीसारख्या महत्त्वाच्या संरचनांपैकी एकही काम पूर्णत्वास गेले नाही. ही कामे पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीसह कंत्राटदार कंपन्यांची कसरत सुरू आहे.
-----------------------
उड्डाणपुलाची कामे प्रगतीपथावर
जिल्ह्यात ५४ किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गावर पॅकेल ४ अंतर्गत ६ आणि पॅकेल ५ अंतर्गत १२ उड्डाणपूल मिळून एकूण १८ उड्डाणपुलांची निर्मिती प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील विविध प्रमुख मार्गांवर हे पूल उभारले जात आहेत. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून या पुलांच्या कामाला कंत्राटदार कंपन्यांनी सुरुवात केली असली तरी अद्याप एकाही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.
---------------
समृद्धी महामार्गावरील संरचना
सरंचना पॅकेज ५ पॅकेज ४ पूर्ण
उड्डाणपूल १२ -०६ - ००
प्रमुख पूल ०२ - ०२ - ००
आरओबी ०१ - ०१ - ००
लघू पूल ०९ - १५ - ०६
व्हीओपी ०४ - ०६ - ००
व्हीयूपी ०७ - ०५ - ०३
एलव्हीयूपी ०४ - ०३ - ०३
कप, यूपीसी १५ - २७ - २६
डब्ल्यूओपी ०२ - ०१ - ००
डब्ल्युयूपी ०० - ०३ - ००
पीओपी ०४ - ०२ - ००
बॉक्स रेल्वे २३ - ५३ - ४४
इतर ०१ - ०२ - ०३
------------------------------------
एकूण ८३ -१२६ - ८५
--------------------------------------