शेतकरी सभासदांच्या उद्दिष्टपूर्तीची कसरत !
By admin | Published: January 21, 2017 02:29 AM2017-01-21T02:29:46+5:302017-01-21T02:29:46+5:30
सेवा सहकारी सोसायटीचे सभासद करण्याचे केवळ ४२ टक्के उद्दिष्ट साध्य.
वाशिम, दि. २0- जिल्हय़ातील सात-बाराधारक शेतकर्यांना सेवा सहकारी संस्थेचे सभासद करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आखलेल्या मोहिमेने ४२ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली असून, अद्याप ५८ टक्के उद्दिष्ट गाठावयाचे आहे.
अर्थव्यवस्थेला बळकटी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यात सहकारी संस्थांची मोलाची भूमिका आहे. शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून गावपातळीवर सेवा सहकारी सोसायट्या स्थापन केल्या जातात. वाशिम जिल्ह्यात ४२४ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. या सोसायटीचे सभासद होण्यासाठी काही अटी असून, अनेक सात-बाराधारक शेतकरी अद्याप सोसायटीचे सभासद झाले नाहीत. जिल्ह्यात १ लाख ९८ हजार सातबाराधारक शेतकरी आहेत. सातबाराधारक शेतकर्यांना सेवा सहकारी संस्थेचे सभासद करून घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला. ऑक्टोबरपासून या ह्यअँक्शन प्लॅनह्णची अंमलबजावणी सुरू झाली. यासंदर्भात सहकार विभागाने उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी वेळोवेळी उपनिबंधक कार्यालयाला सूचना दिल्या. पहिल्या टप्प्यात २५ हजार शेतकर्यांना सेवा सहकारी संस्थेचे सभासद करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. आतापर्यंंत १0५00 च्या आसपास सभासद करण्यात उपनिबंधक कार्यालयाला यश आले असून, अद्याप उर्वरित शेतकर्यांना सभासदत्व देणे बाकी आहे. तालुकास्तरीय कार्यालयातर्फे ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. सभासद झाल्यानंतरच्या फायद्याची माहिती शेतकर्यांना दिली जात आहे. तथापि, अद्याप उद्दिष्टपूर्ती झाली नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे विभागाने स्पष्ट केले.
नोटाबंदीचा निर्णय झाल्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शेतकरी विविध अडचणीत सापडले होते. ऐन रब्बी हंगामात नोटाबंदीमुळे शेतकर्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सेवा सहकारी सोसायटीचे सभासद बनविण्याच्या मोहिमेलादेखील फटका बसला.
सेवा सहकारी सोसायटीचे गाव व तालुकानिहाय नव्याने नेमके किती सभासद झाले, याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होण्याला आणखी काही दिवस कालावधी लागणार आहे. त्यानंतर मोहिमेची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.