पीकनुकसानाची तक्रार नोंदविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:17 PM2020-10-12T15:17:38+5:302020-10-12T15:17:52+5:30

Agriculture News. Washim शेतकरी या संदर्भात पीकविमा कंपनीकडे तक्रार करण्याची धडपड करीत आहेत.

Exercise to report crop loss | पीकनुकसानाची तक्रार नोंदविण्यासाठी कसरत

पीकनुकसानाची तक्रार नोंदविण्यासाठी कसरत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मागील दोन दिवसापासून पश्चिम वºहाडातील काही भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. ते शेतकरी या संदर्भात पीकविमा कंपनीकडे तक्रार करण्याची धडपड करीत आहेत. तथापि, ही तक्रार नोंदविण्यासाठी सुचविलेले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन नेटवर्कअभावी डाऊनलोड होण्यात अडचणी येत आहेत, टोल फ्री क्रमांकावर संपर्क होण्यात अनेक शेतकºयांना अडचणी येत आहेत.
खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकºयांनी सोयाबीन सोंगून शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवले, तर काहींनी सुड्या लावून ठेवल्या आहेत. परतीच्या पावसामुळे हे सोयाबीन भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. यात ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला. त्या शेतकºयांना ७२ तासांत पीकविमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. तथापि, ही तक्रार ७२ तासांच्या आत नोंदविणे आवश्यक असून, त्यासाठी शेतकºयांनी गूगल प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शूरन्स हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात नुकसानाची माहिती देणे, संबंधित पीकविमा कंपनी अथवा उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर, तसेच संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या ई-मेलवर अर्ज करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेबाबत शेतकºयांना पुरेसे ज्ञान नाही, तसेच ग्रामीण भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभावही असल्याने तक्रार कशी करावी, असा प्रश्न अनेक शेतकºयांपुढे उपस्थित झाला आहे.

Web Title: Exercise to report crop loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.