विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्याच्या प्रदर्शनातुन दिला पर्यावरण वाचविण्याचा  संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:54 PM2017-12-28T13:54:28+5:302017-12-28T13:56:02+5:30

exhibition of cloth bag by the students |  विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्याच्या प्रदर्शनातुन दिला पर्यावरण वाचविण्याचा  संदेश

 विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्याच्या प्रदर्शनातुन दिला पर्यावरण वाचविण्याचा  संदेश

Next
ठळक मुद्देकापडी पिशव्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन स्थानिक एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिम येथे करण्यात आले. सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घरातील जुन्या कापडापासून कलाकुसरीने सुंदर आणि सुबक अशा कापडी पिशव्या तयार केल्या.


वाशिम:  दैनंदिन जिवनातील प्लास्टिकच्या वाढत्या उपयोगीतेमुळे पर्यावरणाची विविध मार्गाने हानी होत असून प्लास्टिक वापरावर पर्याय शोधून दैनंदिन जीवनात स्वबनावटीच्या कापडी  पिशव्या वापरान्या संदर्भात विद्यार्थ्यानी बनवीलेया भव्य कापडी पिशव्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन स्थानिक एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिम येथे करण्यात आले. सदर उपक्रमा अंतर्गत शाळेच्या शिक्षिका अस्मिता नरेन वानखडे यांनी शाळेच्या मुख्याधीपिका मिना उबगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना कापडे पीशव्या बनवीन्या संदर्भात आवाहन केले होते. या प्रदर्शनी अंतर्गत वर्ग ७ ते १० च्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घरातील जुन्या कापडापासून कलाकुसरीने सुंदर आणि सुबक अशा कापडी पिशव्या तयार करून प्रदर्शनात माफक दराने विक्रीस उपलब्ध करून उद्योजकतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दीला. दरम्यान हस्तकला प्रदर्शनी अंतर्गत विद्यार्थ्यानी कागदापासुन विविध कलाकुसरीच्या डिझाइन तयार करून प्रदर्शनात सहभाग घेतला होता.  सदर प्रदर्शनी आयोजनासाठी  शाळेतील विद्यार्थी यशोदीप वायाळ, जयेश नंदनवार, राधेश्याम चव्हाण, प्रतिक सावळे, नावेद खान , अभिषेक गोरे, संकेत पवार, गौरव भोयर, अभिषेक भिसडे, ज्ञानेश्वर काळे आदी विद्यार्थ्यानी परीश्रम घेतले तर प्रदर्शनी शाळेतील शिक्षक राम धनगर, युवराज कुसळकर, संजय दळवी यांचे सहकार्य लाभले.सदर उपक्रमाचे एस एम सी इंग्लिश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा हरीभाऊ क्षीरसागर व शाळेच्या मुख्याध्यापिका मिना उबगडे यांच्या कौतुक केले.

Web Title: exhibition of cloth bag by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.