वाशिम येथे गडकिल्ले छायाचित्रांची प्रदर्शनी शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:54 PM2018-02-21T13:54:53+5:302018-02-21T13:56:19+5:30
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील १०८ हून अधिक गडकोटांची एकाहून एक सरस छायाचित्रांची तीन दिवशीय प्रदर्शनी २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान राजे वाकाटक वाचनालयात ठेवण्यात आलीआहे.
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील १०८ हून अधिक गडकोटांची एकाहून एक सरस छायाचित्रांची तीन दिवशीय प्रदर्शनी २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान राजे वाकाटक वाचनालयात ठेवण्यात आलीआहे. या प्रदर्शनीचे सकाळी साडेदहा वाजता नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
हिंदवी परिवार, शिवछत्रपती बहूउद्देशिय युवा संस्था, अशोकभाऊ हेडा मित्रमंडळ व राजे वाकाटक वाचनालयाच्या संयुक्त पुढाकारातुन आयोजीत ही प्रदर्शनी तीन दिवस सकाळी १० ते ७ या वेळेमध्ये विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी नि:शुल्क खुली राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हिंदवी परिवाराचे राज्य कार्याध्यक्ष अमोल मोहीते व अमरावतीचे निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे हे राहतील.