टरबूज, पपईच्या मिश्र लागवडीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:16 IST2019-04-12T16:15:54+5:302019-04-12T16:16:01+5:30
वाशिम: रिसोड तालुक्यातील धुमका येथील शेतकरी अनिल धुळे यांनी १० एकर क्षेत्रात मल्चिंगवर पपई आणि टरबुजाची मिश्र लागवड करण्याचा प्रयोग केला आहे.

टरबूज, पपईच्या मिश्र लागवडीचा प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: रिसोड तालुक्यातील धुमका येथील शेतकरी अनिल धुळे यांनी १० एकर क्षेत्रात मल्चिंगवर पपई आणि टरबुजाची मिश्र लागवड करण्याचा प्रयोग केला आहे. आता ही पिके चांगली बहरली असून, यातून ५५ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अलिकडच्या काळात आधुनिक पद्धतीचा अवलंब करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात शेतकरी यशस्वी होत आहेत. बरेचदा शेतकºयांकडे मुबलक पाणी असतानाही शेतीतून फारसे उत्पन घेता येत नाही. आवश्यक व्यवस्थापनाअभावी त्यांनी केलेला खर्चही वसुल होत नाही; परंतु याला काही शेतकरी अपवाद आहेत. त्यात धुमका येथील शेतकरी अनिल धुळे यांचा समावेश असून, ते सतत विविध प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. त्यांनी यंदा त्यांच्या एकुण शेतीपैैकी १० एकर क्षेत्रात मल्चिंग पद्धतीने पपई आणि टरबुजाची मिश्र लागवड केली आहे. यामुळे क्षेत्र, खर्च कमी झाला असून, पाण्याचीही बचत होणार आहे. गेल्या २० दिवसांपूर्वी त्यांनी ही लागवड केली असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना टरबुजाचे उत्पन्न मिळू शकणार आहे. टरबुजातून एकरी २.५० टन प्रमाणे एकूण २५ टन उत्पादनातून किमान २५ लाख, तर पपईतून ३० लाखांचे उत्पन्न मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता त्यांची ही पिके चांगलीच बहरली असून, इतर शेतकºयांनाही त्यांचा हा प्रयोग आकर्षित करीत आहे.