पीक कर्ज नाकारल्यास बँकांना द्यावे लागणार स्पष्टीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:44 PM2018-06-20T14:44:11+5:302018-06-20T14:44:11+5:30

   वाशिम : पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणणे तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून पीक कर्जासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Explain why banks should reject crop loan! | पीक कर्ज नाकारल्यास बँकांना द्यावे लागणार स्पष्टीकरण!

पीक कर्ज नाकारल्यास बँकांना द्यावे लागणार स्पष्टीकरण!

Next
ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बँकेला द्यावे लागणार आहे. आवश्यक कर्ज, सदर कर्ज कोणत्या बँकेतून पाहिजे, यासह इतर माहिती भरून नोंदणी करता येणार आहे. मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशानुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित शेतकऱ्याने आपण निवडलेल्या बँकेत संपर्क साधावा.

  
वाशिम : पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणणे तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून पीक कर्जासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार बँकेत हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बँकेला द्यावे लागणार आहे. 
पीक कर्जाच्या आॅनलाईन नोंदणीसाठी सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बचत खातेविषयक माहिती, आधार क्रमांक, त्यांच्याकडे असलेली शेतजमीन यासोबतच आवश्यक कर्ज, सदर कर्ज कोणत्या बँकेतून पाहिजे, यासह इतर माहिती भरून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर टोकन क्रमांक व त्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, याविषयी माहिती शेतकºयांना मोबाईलवरच मिळणार आहे. तसेच कर्ज घेण्यासाठी जी बँक निवडली आहे, त्या बँकेकडे आॅनलाईन स्वरुपात शेतकऱ्यांची कर्ज मागणी नोंदविली जाणार आहे.
आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशानुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित शेतकऱ्याने आपण निवडलेल्या बँकेत संपर्क साधावा. यावेळी बँकेतील विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे व कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. या अर्जावर बँकेकडून पुढील कार्यवाही करून पीक कर्ज मंजूर केले जाईल. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज काही कारणास्तव नामंजूर करण्यात आल्यास त्याविषयीचे स्पष्टीकरण बँकेला पीक कर्जविषयक संकेतस्थळावर द्यावे लागणार आहे. कर्ज नाकारण्याचे कारण अयोग्य असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बँकेकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे कळविण्यात आले.

Web Title: Explain why banks should reject crop loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.