कृषी योजनांसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:50+5:302021-03-14T04:36:50+5:30
-------- एकाच दिवशी पाच सापांना जीवदान वाशिम : निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी मानोरासह मंगरुळपीर तालुक्यात शुक्रवारी विविध ठिकाणी ...
--------
एकाच दिवशी पाच सापांना जीवदान
वाशिम : निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी मानोरासह मंगरुळपीर तालुक्यात शुक्रवारी विविध ठिकाणी आढळलेल्या पाच सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. नाग, रुकई, कवड्या, पोवळा, आदी सापांचा त्यात समावेश आहे.
-------
गांडूळ खतासाठी शेतकऱ्यांची धडपड
वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेंर्गत गांडूळ खत निर्मितीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या खताच्या निर्मितीसाठी युनिटचे बांधकामही केले आहे.
-----------------
गोठ्यांसाठी १४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून हरघर गोठे, घर घर गोठे ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविली जात आहे. त्यात १४ ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे गोठ्यांसाठी प्रस्ताव सादर केले आहेत.
-------