शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:44 PM2017-12-01T14:44:33+5:302017-12-01T14:48:05+5:30
वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता खेळाडूंना ९ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता खेळाडूंना ९ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. सदर अर्जांसोबत १०० प्रमाणपत्रांची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने त्यासोबत सादर केलेल्या सर्व अटॅचमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज आॅनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात १५ डिसेंबर २०१७ पूर्वी सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना राबविण्यात येते. राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक, कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक, कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसचे ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०१४-१५, २०१५-१६ व सन २०१६-१७ या वषार्साठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या-त्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक, कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक, कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह ९ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात आॅनलाईन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन क्रीडा अधिकाºयांनी केले आहे.