गटशेती योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:43 PM2018-07-13T13:43:36+5:302018-07-13T13:44:42+5:30

वाशिम : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीला चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Extension to apply for group scheme! | गटशेती योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!

गटशेती योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात सहा गट स्थापन करण्याचा लक्ष्यांक असून या योजनेसाठी अर्ज करण्यास २५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक गट अथवा कंपनी म्हणून नोंदणी असणे आवश्यक राहील.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीला चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याअंतर्गत प्रत्येकी २० शेतकरी गटाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात सहा गट स्थापन करण्याचा लक्ष्यांक असून या योजनेसाठी अर्ज करण्यास २५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छूक शेतकºयांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी १३ जुलै रोजी केले. 
गटशेती योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणाºया शेतकरी गटांचे क्षेत्र सलग किंवा किमान एका शिवारातील असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक शेतकºयांनी आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक गट अथवा कंपनी म्हणून नोंदणी असणे आवश्यक राहील. तसेच योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकरी गटांच्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी सलंग्न असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी गट, समुह, उत्पादक कंपनीची प्राथमिक निवड जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केली जाणार आहे. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आात्मा कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले.

Web Title: Extension to apply for group scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.