वाशिम जिल्ह्यामध्ये मंजूर सिंचन विहिरी पूर्ण करण्यास मुदतवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 06:40 PM2017-12-05T18:40:42+5:302017-12-05T18:41:38+5:30

वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या व आज रोजी अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

Extension to complete the sanctioned irrigation well in Washim district! | वाशिम जिल्ह्यामध्ये मंजूर सिंचन विहिरी पूर्ण करण्यास मुदतवाढ !

वाशिम जिल्ह्यामध्ये मंजूर सिंचन विहिरी पूर्ण करण्यास मुदतवाढ !

Next

वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या व आज रोजी अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवाहर धडक सिंचन योजनेतून मंजूर झालेल्या परंतु अद्याप अपुर्ण असलेल्या विहिरी तातडीने पूर्ण कराव्यात, असे आवाहन रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी मंगळवारी केले.
जवाहर धडक सिंचन विहिर योजनेतील विहिरी,नरेगातून धडक सिंचन विहीर योजनेत वर्ग करण्यात आलेल्या विहिरी व रद्द केलेल्या विहिरींपैकी पुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहिरी, ३० जून २०१८ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहेत. या विहिरी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत. कलविण्यात आले आहे. संबधित लाभार्थी शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन आपल्या अपूर्ण तसेच अद्याप सुरु न झालेल्या धडक सिंचन विहिरी ३० जून २०१८ पूर्वी पूर्ण करून घेऊन या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरडे यांनी केले.

Web Title: Extension to complete the sanctioned irrigation well in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.