सिंचन विहिरीच्या अर्जाला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:44 PM2017-10-27T13:44:39+5:302017-10-27T13:45:49+5:30
वाशिम - आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात लाभार्थींना सिंचन विहिरींचा लाभ दिला जाणार असून, आता अर्ज प्रक्रियेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी शुक्रवारी दिली.

आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच शेतीला सिंचनाची जोड मिळावी यासाठी आदिवासी उपयोजना या घटकांतर्गत सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. यापूर्वी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ आॅक्टोबर अशी होती. मात्र, मुदवाढ देण्याची शेतकºयांची मागणी, आॅनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि कृषी आयुक्तालयाचे पत्र आदी बाबी विचारात घेऊन आता अर्ज प्रक्रियेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असे सभापती सानप यांनी स्पष्ट केले. संबंधित लाभार्थीला ‘कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे लागणार आहेत. सातबारा, आठ अ, जातीचा दाखला, दारिद्ररेषेचे कार्ड, जातपडताळणी प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार क्रमांक, विहिर नसल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची प्रक्रिया आॅनलाईन करावी लागणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन विश्वनाथ सानप यांनी केले.