वाशिममार्गे धावणाऱ्या अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ

By दिनेश पठाडे | Published: November 26, 2023 05:18 PM2023-11-26T17:18:10+5:302023-11-26T17:18:35+5:30

एक्स्प्रेस गाडीला १ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

Extension of Amravati Pune Express running via Washim | वाशिममार्गे धावणाऱ्या अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ

वाशिममार्गे धावणाऱ्या अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ

वाशिम : अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अमरावती-पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला १ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही रेल्वे वाशिममार्गे धावत असल्याने वाशिमकर प्रवाशांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार, गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही गाडी शुक्रवारी आणि रविवारी पुणे येथून रात्री १०:५० वाजता सुटून वाशिम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५४ मिनिटांनी पोहचेल. १ मिनिटाच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होऊन प्रस्थान स्थानकावर सायंकाळी ५:३० वाजता पोहचेल.  तर गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे एक्स्प्रेसला २६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही रेल्वे अमरावती येथून दर सोमवार आणि शनिवारी सायंकाळी ७:५० वाजता निघून वाशिम येथे रात्री १०:२९ वाजता पोहचेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे स्थानकावर पोहचेल. 

पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला उरुळी, केडगाव, दौंड, जिन्ती रोड, जेऊर, कुर्डवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा येथे थांबा आहे.

Web Title: Extension of Amravati Pune Express running via Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे